🔥 ट्रेंडिंग शहडोल बस स्टैंड के पास बिरयानी बनाते स... उत्तर पश्चिम रेलवे ने 12 ट्रेनों के सम... श्री केशर मेमोरियल शिक्षण संस्थान में... गायों के लिए चारा नहीं है ಸೋಮನಮರಡಿ ಗ್ರಾಪಂ ವ್ಯಾಪ್ತಿಯ ಐದು ಗ್ರಾಮಗಳನ... लुधियाना के गिल रोड पर पीआरटीसी बस से...
03 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
देश

कुंभमेळ्याच्या उद्घाटन सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे कोरपना तालुक्यातील आदिवासी नृत्याने भव्य स्वागत

✍️ रिपोर्टर: DOCTOR PINTU PAUL 🗓 03 नव. 2026, 07:29 PM 👁 34
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

कुंभमेळ्याच्या उद्घाटन सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे कोरपना तालुक्यातील आदिवासी नृत्याने भव्य स्वागत

कुंभमेळ्याच्या उद्घाटन सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे कोरपना तालुक्यातील आदिवासी नृत्याने भव्य स्वागत
चंद्रपूर : भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी नाशिक येथील तपोवन परिसरात कुंभमेळ्याच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त विशेष स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील आदिवासी मुला-मुलींनी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करून महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले. आपल्या पारंपरिक वेशभूषेत आणि लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या आदिवासी नृत्य पथकाचे नेतृत्व माननीय अशोकजी आलम, माजी पंचायत समिती सदस्य तथा भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर जिल्हा आदिवासी आघाडीचे महामंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी चिचपल्ली येथील रहिवासी राकेश निंबसरकर यांनीही अशोकजी आलम यांच्यासोबत महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
देशाच्या महामहिम राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील आदिवासी मुला-मुलींना मिळालेली ही संधी संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या माध्यमातून आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि लोककलेचे राष्ट्रीय स्तरावर दर्शन घडले.
या उल्लेखनीय सहभागाबद्दल अशोकजी आलम, राकेश निंबसरकर तसेच आदिवासी नृत्य सादर करणाऱ्या सर्व मुला-मुलींचे परिसरातून कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.
📲Get App