🔥 TRENDING Gujarat CM reviews 16 departments, che... राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी ने नागौर,... Draft Voter List Shows 4.48 Crore Elec... भीम आर्मी व आजाद समाज पार्टीने बु येथे... 2027ની ચૂંટણી પહેલાં ગુજરાતની નવી ડ્રા... Neal PM’s Gujarat Ties Highlighted by...
27 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

ज्येष्ठ पत्रकार काशिनाथ देसले यांना प्रतिष्ठित 'दर्पण रत्न पुरस्कार' जाहीर.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 27 Nov 2026, 11:34 PM 👁 18
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
मुरबाड (प्रतिनिधी : किशोर पवार) :
पत्रकारिता क्षेत्रातील सातत्यपूर्ण, सत्यनिष्ठ आणि जनहितार्थ कामगिरीची दखल घेत ज्येष्ठ पत्रकार श्री. काशिनाथ देसले यांना यंदाचा प्रतिष्ठित 'दर्पण रत्न पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. वृत्तपत्र 'दैनिक दर्पण परिवार' व 'हिंदी मराठी पत्रकार संघ' (आंतरराष्ट्रीय मानांकन ISO 9001-2015 प्राप्त) यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
श्री. काशिनाथ देसले यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच ग्रामीण विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न, सामाजिक समस्या आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या या निस्वार्थ व उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांचा हा विशेष सन्मान करण्यात येत आहे.
या पुरस्काराच्या घोषणेनंतर मुरबाडसह संपूर्ण पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातून श्री. देसले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याची तारीख आणि स्थळ आयोजकांकडून लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे..
📲Get App