🔥 TRENDING અમદાવાદમાં દિવાળી નિમિત્તે ખોડલ કૃપા લ... Amitabh Bachchan Celebrates 84th Birth... ‘Community’ Cast Updates Fans on Upcom... New Naruto Anime Series Announced Alon... Raveena Tandon Starts Filming Kannada... Telangana Today opinion links literacy...
12 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

जय भवानी ट्रस्टतर्फे शिरूरच्या महाराणीची वाजत-गाजत स्थापना

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 12 Oct 2026, 12:40 AM 👁 25
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

शिरूरची महाराणी’ देवीची वाजत-गाजत मिरवणूक

शिरूर (प्रतिनिधी) : 11 ऑक्टोंबर 2026 काची आळी, शिरूर येथील जय भवानी ट्रस्टच्या वतीने घटस्थापना व शारदीय नवरात्रारंभाच्या निमित्ताने ‘शिरूरची महाराणी’ देवीची वाजत-गाजत मिरवणूक काढून विधिवत स्थापना करण्यात आली.
नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी भक्तिमय वातावरणात देवीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. साऊंड सिस्टिम वाद्यांचा निनाद आणि भक्तांच्या जयघोषात मिरवणूक उत्साहात पार पडली. यावेळी परिसरातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जय भवानी ट्रस्टच्या माध्यमातून नवरात्रोत्सव भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात येणार असून, उत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात नवरात्रोत्सवाचे उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
📲Get App