जळगावातील आकाशवाणी चौकात भीषण अपघात; ट्रकने दुचाकीला चिरडले, रवींद्र चौधरी यांचा जागीच मृत्यू....!!!
Watch on:
▶️ YouTube
विभागीय प्रतिनिधी
जळगाव - शहरातील आकाशवाणी चौकाजवळ आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
मृत व्यक्तीचे नाव रवींद्र चौधरी असे असून, ते शिव कॉलनी येथून आकाशवाणी चौकाच्या दिशेने जात होते, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. आकाशवाणी चौकात आल्यावर भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, चौधरी यांचा जागेवरच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे काही काळ आकाशवाणी चौकात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या घटनेनंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. फरार ट्रक चालकाचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुढील तपास पोलीस करत आहेत.