🔥 ट्रेंडिंग पटियाला में मुख्यमंत्री आवास के सामने... पुनिया की ढाणी नौसर में बोरवेल में गिर... गांधी मैदान में पटना का दूसरा सबसे बड़... नौजवान लड़की ने रक्तरंजित माता-पिता को... जोकीहाट में दुर्गा पूजा के लिए पुलिस औ... पूर्व राज्यसभा सांसद वशिष्ठ नारायण सिं...
18 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

जिल्हाधिकाऱ्यांकडून झाडघर येथे भातशेती नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी; आमदार किसनजी कथोरे व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बळीराजाला तात्काळ मदतीची मागणी .

✍️ रिपोर्टर: Kashinath Desale 🗓 18 अक्टू. 2026, 05:35 PM 👁 60
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक १८/१०/२०२६
मुरबाड:ठाणे विशेष वृत्त
मुरबाड तालुक्यातील झाडघर (वैशाखरे) येथे अवकाळी संकटामुळे झालेल्या भातशेती नुकसानीची ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. डॉ. श्रीकृष्ण पांचाळ साहेब यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. याप्रसंगी मुरबाड विधानसभेचे लोकप्रिय आमदार किसनजी कथोरे साहेब, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार, मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पवार आणि अनिल घरत, उल्हास बांगर,यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी आणि सर्व लोकप्रतिनिधींनी झाडघर येथील शेतकरी श्री. केशव गोमा वाघ यांच्या शेताला भेट दिली. तेथे पिकांच्या झालेल्या नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेत शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. आमदार किसनजी कथोरे आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली की, शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टाचे झालेले हे नुकसान अतिशय चिंतेचे असून, बळीराजाला या कठीण प्रसंगात त्वरित व योग्य शासकीय मदत मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनीही यावर सकारात्मक भूमिका मांडत उपस्थित यंत्रणेला गांभीर्याने लक्ष देण्याचे निर्देश दिले. पिकांच्या नुकसानीची अचूक नोंद घेऊन नियमानुसार आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही त्वरित पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
"बाधित बळीराजाला संपूर्ण दिलासा मिळावा आणि त्याच्या नुकसानीची योग्य दखल घेतली जावी, hयासाठी आम्ही सर्व स्तरावर कटिबद्ध आहोत," असा विश्वास यावेळी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आला. या पाहणी दौऱ्यावेळी परिसरातील बहुसंख्य शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
📲Get App