🔥 ट्रेंडिंग નારેશ્વરથી પગપાળા પરિક્રમાવાસીઓ તિલકવા... पंजाब और चंडीगढ़ में सूखा, 28 अक्टूबर... પાટણ જિલ્લા, સમી તાલુકામાં તળાવમાં યુવ... मोगा, पंजाब में स्कॉर्पियो से गोलीबारी... राहुल गांधी ने पंजाब चुनाव अभियान की श... સુરતમાં 150 મોટરસાઇકલની નશામુક્તિ રેલી...
26 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्थानीय

हिरपोडीत पुन्हा अघोरी प्रकार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तीन ठिकाणी लिंबू-नारळ, काळी बाहुली व अन्य साहित्य आढळले; दोषींवर कारवाईची मागणी

✍️ रिपोर्टर: किरण सदाशिव आंबिके 🗓 26 अक्टू. 2026, 01:00 PM 👁 15
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
पुण्यातील राजगड तालुक्यातील हिरपोडी गावाच्या परिसरात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा अघोरी प्रकार रविवारी (दि. २५ ऑक्टोबर) उघडकीस आल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिरपोडी गावात तीन ठिकाणी लिंबू-नारळ, बिबवे, कोहाळे, दही-भात, काळी बाहुली, हळद कुंकू आढळून आले. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संभ्रम व भीती पसरली आहे.

यापूर्वीही हिरपोडी गावातच असाच जादूटोण्याचा अघोरी प्रकार उघडकीस आला होता. त्या वेळी गावातील दोन व्यक्तींच्या छायाचित्रांना लिंबू, बिबवा, काळ्या बाहुलीला खिळा टोचल्याचा प्रकार घडला होता. अशा घटना वारंवार घडत असल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे.

या प्रकाराबाबत स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन अशा अघोरी प्रकारांवर आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, नागरिकांची फसवणूक, अंधश्रद्धाजन्य कृत्ये, शारीरिक अथवा मानसिक छळ, महिलांवरील अत्याचार किंवा आर्थिक शोषण रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. अशा प्रकारची घटना घडल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व निर्मूलन अधिनियम, २०१३ अन्वये गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
📲Get App