🔥 ट्रेंडिंग अनूपपुर में 24 ईवीएम गायब, 2021 की फाइ... पीएम आवास योजना में मुखिया की घूसखोरी... अडावद वन विभागाची पहाटे धडक कारवाई; सा... अडावद वन विभागाची पहाटे धडक कारवाई; सा... हरेवली गौशाला में सपरिवार हवन-पूजन और... अडावद वन विभागाची पहाटे धडक कारवाई; सा...
04 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
कृषि

🚨 हिंगोली जिल्ह्यातील साबळखेडा गाव दुष्काळाच्या भीषण संकटात! प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी 🚨

✍️ रिपोर्टर: Vitthal Bhagvat Kharat 🗓 04 अक्टू. 2026, 06:35 PM 👁 16
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
हिंगोली जिल्ह्यातील साबळखेडा गाव दुष्काळाच्या भीषण संकटात! प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी 🚨

📍 ठिकाण : साबळखेडा, ता. सेनगाव, जि. हिंगोली

साबळखेडा गावात सध्या दुष्काळाची अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गावात पाण्याची मोठी टंचाई असून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतीतील पिके पाण्याअभावी वाळत आहेत. शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

एकीकडे पिके डोळ्यांदेखत वाळत आहेत, तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई नागरिकांना त्रस्त करत आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने केलेला खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गावातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना तातडीच्या मदतीची गरज आहे.

प्रशासनाने साबळखेडा गावातील दुष्काळी परिस्थितीची तातडीने पाहणी करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

🛑 सरकारी अधिकारी नी गावात येऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी आणि शेतकरी व ग्रामस्थांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवावा, ही विनंती.

— समस्त ग्रामस्थ, साबळखेडा, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली
📲Get App