🔥 TRENDING Congress Conducts Workshop in Madhya P... India Women’s Hockey Beat Malaysia 6-2... Prisoner with Cancer Denied AIIMS Visi... Election Commission Sets New Dates for... NCW Chief Vijaya Rahatkar Leads Women-... Tejashwi Yadav Reaffirms RJD's Opposit...
28 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

हेडलाईन : उसगाव नाल्यात विषारी पाणी? अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा, नाहीतर हिवाळी अधिवेशनात अन्नत्याग आंदोलन - राजेश बेले*

✍️ Reporter: Doctor Pintu Paul 🗓 28 Nov 2026, 06:28 PM 👁 11
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

घुग्घुस / चंद्रपूर : मेसर्स लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी, लोहखनिज कारखाना, घुग्घुस यांच्याकडून घातक रसायन, घाण कचरा आणि रासायनिक द्रव्य उसगाव नाल्यामध्ये सोडले जात असल्याचा गंभीर आरोप पर्यावरणवादी राजेश बेले यांनी केला आहे.

घुग्घुस / चंद्रपूर : मेसर्स लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी, लोहखनिज कारखाना, घुग्घुस यांच्याकडून घातक रसायन, घाण कचरा आणि रासायनिक द्रव्य उसगाव नाल्यामध्ये सोडले जात असल्याचा गंभीर आरोप पर्यावरणवादी राजेश बेले यांनी केला आहे.
बेले यांच्या म्हणण्यानुसार, वारंवार तक्रार देऊन, आंदोलन करूनही कारवाई झाली नाही. त्यानंतर २१ नोव्हेंबर २०२६ रोजी शनिवारी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी कारखान्यात पाहणीसाठी गेले होते.

यात सदस्य सचिव, वैज्ञानिक प्रभारी अधिकारी विश्वजीत ठाकूर, चंद्रपूरचे क्षेत्रीय अधिकारी व प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव, उपप्रादेशिक अधिकारी सुशीलकुमार राठोड आणि इतर अधिकारी उपस्थित होते, असे बेले यांनी सांगितले.

मात्र अधिकाऱ्यांनी कारखान्यात पाहणी केली, पण ज्या नाल्यामुळे १०० एकरपेक्षा जास्त शेतजमीन बाधित झाली आहे, त्या नाल्याची पाहणी केली नाही आणि पाण्याचे नमुने घेतले नाहीत, असा आरोप बेले यांनी केला आहे.

तसेच प्रादेशिक आणि उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी शहरातील आणि जिल्ह्यातील उद्योग कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात वसुली केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ही वसुली कोणासाठी केली होती, हे समोर यावे म्हणून या अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी बेले यांनी केली आहे.
बेले म्हणाले, जर टेस्टमध्ये वसुली केली नाही, पैसा खाल्ला नाही, असा अहवाल आला तर न्यायालय, पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन जी शिक्षा देईल ती भोगायला आम्ही तयार आहोत.
पण न्याय मिळाला नाही तर शेतकऱ्यांना, पर्यावरणाला आणि मानवी आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या प्रकरणाविरोधात हिवाळी अधिवेशन काळात अन्नत्याग आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
📲Get App