🔥 ट्रेंडिंग M.S.B. Arts and Commerce College hosts... Bidar news मंझिआंव थाना में दुर्गा पूजा शांतिपूर्... Delhi to Install 100,000 Smart Street... International Scientists Debate Abando... India's Aditya-L1 and Europe's Proba-3...
16 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
अपराध

घरफोडी आणि गोळीबाराच्या घटनेने परिसर हादरला; व्यापाऱ्यासह १२ वर्षांची मुलगी जखमी

✍️ रिपोर्टर: Anil Mallav 🗓 16 अक्टू. 2026, 03:22 PM 👁 17
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

परिसरात दहशतीचे वातावरण

घरफोडी आणि गोळीबाराच्या घटनेने परिसर हादरला; व्यापाऱ्यासह १२ वर्षांची मुलगी जखमी

परिसरात दहशतीचे वातावरण

शिरूर प्रतिनिधी 16 ऑक्टोबर 2026

पहाटेच्या सुमारास बंगल्यात शिरलेल्या चोरट्याने केलेल्या गोळीबारात व्यापारी उमेश चंदनमल छाजेड (वय ४५) हे गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या त्यांच्या १२ वर्षांच्या मुलीने, मानवी हिने चोरट्याला तीव्र प्रतिकार केला; मात्र चोरट्याने तिलाही मारहाण केल्याने तिच्या हाताला दुखापत झाली आहे.
नेमकी घटना काय घडली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी उमेश छाजेड हे पहाटे नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्याचवेळी एका चोरट्याने त्यांच्या बंगल्यात प्रवेश केला. घरात चोर शिरल्याचे लक्षात येताच छाजेड तातडीने माघारी आले. यावेळी त्यांची चोरट्याशी जोरदार झटापट झाली. या झटापटीदरम्यान चोरट्याने छाजेड यांच्यावर गोळीबार केला, ज्यामध्ये ते जखमी झाले.
वडिलांवर हल्ला होत असल्याचे पाहून त्यांची १२ वर्षांची मुलगी मानवी हिने धाडस दाखवत वडिलांना वाचवण्यासाठी चोरट्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, चोरट्याने तिलाही मारहाण केली, ज्यामध्ये तिच्या हाताला दुखापत झाली.
इतर ठिकाणीही चोरीचा प्रयत्न:
या घटनेपूर्वी संबंधित चोरट्याने अजित ओस्तवाल यांच्या बंगल्याच्या बाल्कनीतून घरात प्रवेश करून कपाट फोडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गुरुवारी पहाटेच्या सुमारास भाजी बाजार परिसरात दुचाकीवरून आलेल्या याच चोरट्याने एका महिलेला बंदूक दाखवून चोरीचा प्रयत्न केला होता. मात्र, महिलेने प्रसंगावधान राखून आरडाओरड केल्याने चोरट्याचा तो प्रयत्न फसला होता.
एकाच परिसरात एकापाठोपाठ एक घडलेल्या घरफोडी, चोरीचा प्रयत्न आणि गोळीबाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
📲Get App