🔥 TRENDING Gold Rates in Kerala for 22 and 24 Car... Centre appoints Justice P Sam Koshy as... Telangana Today Examines Retirement Pl... Two New Gecko Species Found in Telanga... Odisha Student Union Election Dates An... Odisha Issues Strict Guidelines, Zero...
06 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
गुटख्याच्या बोलेरोला अपघाताचा दणका; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, तस्करीचा पर्दाफाश?

गुटख्याच्या बोलेरोला अपघाताचा दणका; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, तस्करीचा पर्दाफाश?

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 19 Aug 2026, 05:03 PM 👁 56
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
गुटख्याच्या बोलेरोला अपघाताचा दणका; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, तस्करीचा पर्दाफाश?

विभागीय प्रतिनिधी
बोदवड : महाराष्ट्रात गुटखा विक्री व वाहतुकीवर बंदी असतानाही संशयित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या बोलेरो वाहनाला बोदवड हद्दीत अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १८ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. अपघातानंतर बोलेरोची तपासणी केली असता त्यामध्ये विमल गुटख्याचा मोठा साठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातून गुटख्याचा माल घेऊन बोलेरो वाहन बोदवडच्या दिशेने येत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या वाहनाची दुचाकीला धडक झाल्याने गंभीर अपघात घडला. या घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघातानंतर पोलिसांनी संबंधित बोलेरो वाहन ताब्यात घेऊन पाहणी केली असता त्यामध्ये विमल गुटख्याचा संशयित साठा आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बंदी असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा कोणाच्या माध्यमातून आणि कुठे वाहून नेला जात होता, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

बंदी असूनही गुटख्याची वाहतूक; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न

मुक्ताईनगर शहरातून पूर्णा फाटा मार्गे संशयित गुटखा वाहतूक करणारी वाहने पुढे बोदवड हद्दीत जात असल्याची चर्चा परिसरात आहे. विशेष म्हणजे सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा बंदोबस्त आणि गस्त वाढविण्यात आली असतानाही संशयित मालाने भरलेले वाहन शहरातून पुढे गेले कसे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

अपघातानंतर घटनास्थळी असलेल्या वाहनाची पोलिसांनी पाहणी केली असून त्यातील मालाची अधिकृत तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. मालाचे नेमके स्वरूप, प्रमाण, वाहतुकीशी संबंधित कागदपत्रे तसेच मालाचा स्रोत आणि तो कुठे पोहोचविला जाणार होता, याचा तपास करण्यात येत आहे.

संपूर्ण साखळी उघड करण्याची मागणी

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल मोहन पाटील आणि प्रभाकर जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बोलेरो वाहन ताब्यात घेतले असून त्यातील मालाची अधिकृत तपासणी व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, अपघातात दुचाकीस्वाराचा जीव गेल्याने परिसरात संतापाचे वातावरण आहे. बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतूक होत असल्याचे प्रकरण समोर आल्याने केवळ वाहनचालकांवर कारवाई न करता या संपूर्ण तस्करीमागील सूत्रधार आणि वाहतूक साखळीचा शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या घटनेची वस्तुस्थिती अपघाताचे नेमके कारण, बोलेरोमधील मालाचे अधिकृत प्रमाण, मालाचा स्रोत, त्याचा पुढील ठावठिकाणा आणि या प्रकरणात कोणावर कायदेशीर कारवाई करण्यात आली, याबाबत पोलिसांकडून स्पष्ट माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे.
📲Get App