🔥 TRENDING Kapil Sharma Discusses CEC Impeachment... Husband Takes Own Life After Wife Hang... କାଳିମେଳା ଆଦିବାସୀ କଲୋନୀରେ ବିଧାୟକ ପାଣ୍ଠି... चेतगंज पुलिस ने गुमशुदा बालिका को सुरक... କାଳିମେଳା ଆଦିବାସୀ କଲୋନୀରେ ବିଧାୟକ ପାଣ୍ଠି... Rajasthan raises DA by 3% to 63% effec...
30 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

ग्रामीण मातीतून लावणी कलेचा नवा अविष्कार!

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 30 Oct 2026, 09:22 PM 👁 24
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

या लावणीचे पुढील चित्रीकरण रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी समर्थ गार्डन लॉन्स, बोराडे मळा येथे होणार

ग्रामीण मातीतून लावणी कलेचा नवा अविष्कार!

‘राया मला पळवून न्या की राव’ला मान्यवरांची कौतुकाची थाप

पुणे प्रतिनिधी : 30 ऑक्टोबर 2026
तमाशा व लावणीसारख्या महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककला जतन करण्याच्या उद्देशाने तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माते, दिग्दर्शक, लेखक, कवी, गायक व अभिनेते रामदासजी राऊत यांनी ‘राया मला पळवून न्या की राव’ या नव्या लावणीची निर्मिती केली आहे. या लावणीला कलावंत व रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

अस्सल ग्रामीण बोली, सहजसुंदर शब्दरचना, पारंपरिक लावणीचा बाज आणि ठेका धरायला लावणारे संगीत हे या लावणीचे वैशिष्ट्य आहे. गीतलेखन रामदासजी राऊत, संगीत गणेश आस्वार आणि गायन राखी चौरे यांचे असून ढोलकी, हार्मोनियम व संगीताची सुरेख जुळवाजुळव यामुळे लावणीला विशेष रंगत आली आहे. ‘सांगते ऐका’, ‘एक गाव बारा भानगडी’ आणि ‘पिंजरा’च्या पारंपरिक लावण्यांची आठवण करून देणारा ग्रामीण बाज यात दिसतो.

निवृत्त पोलीस अधिकारी विकास अत्रे यांनी राऊत यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. डॉ. संपतराव पार्लेकर यांनी बेल्हेसारख्या ग्रामीण भागातून दर्जेदार लावणीची निर्मिती होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. गायिका व नृत्यांगना शोभाताई लाखे यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. पापाभाई बोरगावकर यांनी शब्द, ढोलकी व संगीताचे कौतुक केले, तर ज्येष्ठ लावणी कलावंत राजश्री काळे नगरकर यांनी लावणी कला जिवंत ठेवण्यासाठी राऊत यांच्या प्रयत्नांचे स्वागत केले. शुभम सौरभ यांनी लावणीला अस्सल ग्रामीण ठसका असलेली धमाकेदार लोककृती म्हटले. डॉ. गणेश चंदनशिवे, मुंबई यांच्यासह अनेक मान्यवरांनीही टीमला शुभेच्छा दिल्या.

१ नोव्हेंबरला चित्रीकरण

या लावणीचे पुढील चित्रीकरण रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी समर्थ गार्डन लॉन्स, बोराडे मळा येथे होणार आहे. यात पारंपरिक लावणी, तमाशा कलेचा ठसका, ग्रामीण संस्कृती आणि महाराष्ट्राच्या लोककलेचे वैभव सादर केले जाणार आहे.

ही लावणी लावणी क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत स्वर्गीय शकुंतला नगरकर यांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करण्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. ग्रामीण मातीतूनही दर्जेदार कलाकृती निर्माण होऊ शकतात, हे तृप्ती फिल्म प्रोडक्शनने दाखवून दिले असून, लोप पावत चाललेल्या लावणी-तमाशा कलेला नवसंजीवनी देण्याचा हा प्रयत्न ठरत आहे.
📲Get App