🔥 TRENDING ਪੰਜਾਬ ਸਕੂਲ ਸਿੱਖਿਆ ਬੋਰਡ ਨੇ ਐਲਾਨਿਆ 10ਵੀਂ... ದಾವಣಗೆರೆ ಜಿಲ್ಲೆಯ ಭತ್ತ ಬೆಳೆಗಾರರ ಹಿತ ಕಾಪ... ਜਲੰਧਰ 'ਚ ਪਟਾਕੇ ਦੀਆਂ ਦੁਕਾਨਾਂ ਲਗਾਉਣ ਵਾਲਿ... नवादा में पपेट शो से साइबर सुरक्षा जाग... Mathura अहोई अष्टमी के अवसर पर राधा कु... શું થશે કંઇ એવું જેના થી બધા હજી અજાણ...
02 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

गर्भवती महिलेचा गूढ मृत्यू; चुंचाळे गायरान परिसरात शोककळा....!!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 02 Nov 2026, 05:19 PM 👁 8
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
किनगाव, ता. यावल : यावल तालुक्यातील चुंचाळे गायरान येथील आदिवासी वस्तीत रविवारी सकाळी हृदयद्रावक घटना घडली. पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या २६ वर्षीय महिलेचा अचानक चक्कर येऊन मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

सुरेखा दिनेश बारेला (वय २६, रा. चुंचाळे गायरान) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या चुंचाळे गावापासून सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गायरान वस्तीवर कुटुंबासह वास्तव्याला होत्या. त्या पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या. मागील दोन दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत होते. शनिवारी रात्रीही त्रास जाणवत असल्यामुळे रविवारी सकाळी रुग्णालयात नेण्याचे कुटुंबीयांनी ठरवले होते.

परंतु, नियतीने घात केला. रविवारी सकाळी सुमारे आठ वाजेच्या सुमारास त्यांना अचानक भोवळ आली. त्या घरातच जमिनीवर कोसळल्या आणि बेशुद्ध झाल्या. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

या घटनेप्रकरणी पती दिनेश मोहन बारेला यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी पुढील तपास करीत आहेत. तरुण वयात गर्भवती महिलेचा असा अचानक मृत्यू झाल्याने चुंचाळे गायरान वस्तीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
📲Get App