🔥 ट्रेंडिंग સુરત: કુમકોતર-સાંધ્રા મુખ્ય માર્ગ પર ન... চীনা লাইটের দাপটেও হার না মানা পুরুলিয... చర్ల బస్టాండ్ సెంటర్లో ట్రాఫిక్ ఇబ్బంద... रॉहित शर्मा का रन‑आउट, ऑकलैंड ODI में... ભાવનગર માં એર શો નુ આયોજન तेलंगाना टुडे ने प्रकाशित किया संपादकी...
05 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
राजनीति

गुहागरमध्ये 'राष्ट्र चिंतन संवाद' संपन्न; 'लोकशाही वाचवा, अराजकता हटवा' अभियानांतर्गत भाजपचे मोठे आयोजन

✍️ रिपोर्टर: Dr.Aniket Mestri 🗓 05 नव. 2026, 04:16 PM 👁 10
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

भारतीय जनता पार्टीच्या 'लोकशाही वाचवा, अराजकता हटवा' अभियानांतर्गत गुहागर येथे 'राष्ट्र चिंतन संवाद' कार्यक्रम उत्साहात पार पडला.

भारतीय जनता पार्टीच्या 'लोकशाही वाचवा, अराजकता हटवा' अभियानांतर्गत गुहागर येथील भाजपा कार्यालयात उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचा 'राष्ट्र चिंतन संवाद' कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व, लोकशाही मूल्यांचे जतन आणि देशाच्या लोकशाही परंपरेचे रक्षण करण्याच्या उद्देशाने हे अभियान राज्यभरात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश सचिव तथा उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकशाहीची मूलभूत तत्त्वे, देशासमोरील विविध आव्हाने आणि राष्ट्रहिताच्या विषयांवर सखोल विचारमंथन करण्यात आले. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांची भूमिका काय असावी, जनतेमध्ये लोकशाही मूल्यांविषयी जागरूकता कशी निर्माण करावी आणि संघटनात्मक पातळीवर हे अभियान अधिक प्रभावीपणे कसे राबवावे, यावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला भाजपा नेते व खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, आमदार सूर्यकांत दळवी, खेड पंचायत समितीचे सभापती विजयराव कदम, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्मिता जावकर, श्रीराम इदाते, मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, संजय आखाडे, अक्षय फाटक, वैभवी वैभव खेडेकर, राजू भाई रेडीज, वसंत ताम्हणकर, वैभव नारकर, प्रसाद मांडवकर, भालचंद्र साळवी, गणेश हळदे, शुभम गायकवाड, विजय गुप्ता, सर्वेश पवार आणि प्रदीप भोसले यांच्यासह उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'लोकशाही वाचवा, अराजकता हटवा' अभियानाद्वारे लोकशाही मूल्यांचे रक्षण आणि राष्ट्रहिताची जाणीव करून देऊन संघटनात्मक एकजूट अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. गुहागर येथील या संवादामुळे उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात या अभियानाला अधिक व्यापक स्वरूप देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण दिशा मिळाली आहे.
📲Get App