एसटी प्रवाशांना दिवाळी गिफ्ट! १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव फेटाळला....!
विभागीय प्रतिनिधी
मुंबई : दिवाळी सणासाठी गावी जाणाऱ्या लाखो एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळीच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने सुचवलेली १५ टक्के हंगामी भाडेवाढ परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी धुडकावून लावली आहे.
या निर्णयामुळे १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या गर्दीच्या काळात प्रवाशांना वाढीव तिकीट दराचा भुर्दंड सहन करावा लागणार नाही. आहे त्याच दरात प्रवास करता येणार आहे.
दिवाळी सुट्टीत एसटीच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ होते. या अतिरिक्त गर्दीचा विचार करून महामंडळाकडून दरवर्षीप्रमाणे हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
मात्र सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील जनता आर्थिक संकटात आहे. महागाईने सर्वसामान्यांचे बजेट आधीच विस्कळीत झाले असताना सणासुदीच्या काळात प्रवास महाग करणे योग्य नसल्याची भूमिका सरनाईक यांनी घेतली.
एसटी ही ग्रामीण भागाचा कणा आहे. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, नोकरदार वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांची ती लाईफलाईन आहे. भाडेवाढ झाल्यास त्याचा थेट फटका त्यांच्या खिशाला बसला असता.
महामंडळ सध्या तोट्यात असले तरी त्याची झळ सामान्य प्रवाशांवर टाकणे योग्य नाही. तोटा भरून काढण्यासाठी इतर पर्यायी मार्गांचा विचार करू, पण जनतेवर अतिरिक्त भार टाकणार नाही, असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.
या निर्णयामुळे दिवाळीत घर गाठू पाहणाऱ्या प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून, चिंतामुक्त प्रवासाचे नियोजन करणे आता शक्य होणार आहे.