Health
एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे अस्वच्छ आढळल्यास विभाग नियंत्रक जबाबदार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कडक इशारा.
एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे अस्वच्छ आढळल्यास विभाग नियंत्रक जबाबदार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कडक इशारा
नीड २४ न्यूज
जिल्हा रिपोर्टर: काशिनाथ देसले, ठाणे.
तालुका रिपोर्टर: किशोर पवार, मुरबाड.
विशेष वार्ता, दिनांक: २६ ऑक्टोबर २०२६.
मुंबई/ठाणे:
एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांची (Restrooms) स्वच्छता राखण्यात कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा थेट आणि कडक इशारा राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (MSRTC) अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. बसस्थानकांवर अस्वच्छता आढळल्यास त्यासाठी थेट संबंधित विभाग नियंत्रकांना (Divisional Controllers) जबाबदार धरले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित स्वच्छता आढावा बैठकीत ते बोलत होते.
२ रुपये स्वच्छता अधिभार घेता, मग सुविधा का नाही?
बैठकीत बोलताना परिवहन मंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले. "सर्वसामान्य प्रवाशांकडून आपण तिकीट दरासोबत दोन रुपये स्वच्छता अधिभार (Cess) आकारतो. प्रवासीही ही रक्कम प्रामाणिकपणे देतात. त्यामुळे प्रवाशांना किमान स्वच्छतेच्या सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे," असे सरनाईक यांनी ठासून सांगितले. बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे अस्वच्छ राहिल्यास त्याचा थेट परिणाम एसटी महामंडळाच्या प्रतिमेवर होतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
कंत्राटदारांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही!
परिवहन मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले आहेत की, केवळ कंत्राटदार संस्थांवर जबाबदारी ढकलून अधिकाऱ्यांना मोकळे होता येणार नाही. अधिकृत करारांनुसार कंत्राटदारांकडून योग्य प्रकारे स्वच्छता करून घेणे आणि आपल्या कार्यक्षेत्रातील स्वच्छतेवर स्वतः लक्ष ठेवणे हे अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. यासाठी प्रसाधनगृहांची नियमित तपासणी (Inspection) करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
प्रवाशांना सुरक्षित, सुखकर प्रवासासोबतच आरोग्यदायी सुविधा देणे ही एसटी प्रशासनाची मूलभूत जबाबदारी असून, यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असा इशारा या बैठकीत देण्यात आला. या बैठकीला महामंडळाचे सर्व विभागप्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रक उपस्थित होते