🔥 TRENDING उत्तराखंड के बागेश्वर में आदि बद्री मा... बेतिया नगर थाना कि पुलिस ने 115 किलो ग... बुलंदशहर में नकली क्रीम फैक्ट्री का भं... ધંધુકા હાઇવે પર ડમ્પર અને ગાડી વચ્ચે ભ... ರಾಯಚೂರು ತಾಲೂಕಿನ ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ... સાદર પ્રાથમિક શાળામાં આચાર્ય દ્વારા બા...
16 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही; राज्यभर विशेष मतदार नोंदणी शिबिर......!!

एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही; राज्यभर विशेष मतदार नोंदणी शिबिर......!!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 16 Oct 2026, 11:18 AM 👁 13
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

मुंबई, दि. १६ - राज्यातील एकही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाऊ नये, या उद्देशाने निवडणूक यंत्रणेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत १७, १८ तसेच २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६ या चार दिवशी राज्यभरातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने नागरिकांना या शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे. नाव नसल्यास किंवा दुरुस्ती आवश्यक असल्यास २६ ऑक्टोबरपर्यंत विहित नमुन्यात ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी व्यापक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. राज्यातील ३६ जिल्हा निवडणूक अधिकारी, २८८ मतदार नोंदणी अधिकारी, ७ हजार १०० सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि १ लाख २५३ केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) कार्यरत असणार आहेत. शिबिराच्या दिवशी मतदान केंद्रांवर केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहून मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती आणि इतर प्रक्रियांबाबत नागरिकांना मार्गदर्शन व सहाय्य करतील.

मतदार नोंदणी ही निरंतर सुरू राहणारी प्रक्रिया असून ज्या पात्र नागरिकांचे नाव प्रारूप यादीत नाही, त्यांना नमुना अर्ज क्रमांक ६ द्वारे नोंदणी करता येणार आहे.

मतदार यादी तपासणी, अर्ज भरण्याची प्रक्रिया किंवा कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी १९५० या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
📲Get App