🔥 TRENDING बगोदर अनुमंडल के तीन बिजली सब स्टेशनों... નિરમાલી ગામથી લીલાજી મુવાડા ખાતે નાગેશ... જય મસાણી મેલડી મંદીર દ્વારા દાનની અપીલ देहरी खादर में महिलाओं ने अवैध शराब के... Delhi Remains Dry as Monsoon Pulls Bac... ED files complaint in Chhattisgarh rec...
24 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
डोरली (भांडवलकर) येथील १६ महिलांचा समता सैनिक दलात प्रवेश

डोरली (भांडवलकर) येथील १६ महिलांचा समता सैनिक दलात प्रवेश

✍️ Reporter: Deepak Shankarrao Dhoke 🗓 24 Sep 2026, 06:12 PM 👁 12
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
काटोल : तालुक्यातील डोरली (भांडवलकर) येथील १६ महिलांनी सामाजिक बांधिलकी जपत समता सैनिक दलात प्रवेश घेतला. काटोल येथे आयोजित कार्यक्रमात समता सैनिक दलाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नव्याने प्रवेश घेतलेल्या महिला सैनिकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी डोरली (भांडवलकर) शाखेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व संघटक पदांची निवडही करण्यात आली.

“शील! शौर्य! बलिदान!!!” या ब्रीदवाक्याने तसेच “गाव तिथे शाखा, घर तिथे सैनिक” या संकल्पनेनुसार समता सैनिक दलाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. महिलांचा संघटनात्मक व सामाजिक कार्यातील सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने डोरली (भांडवलकर) येथील १६ महिलांनी घेतलेला हा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

या कार्यक्रमाला समता सैनिक दल नागपूर ग्रामीण (०१)चे जिल्हाध्यक्ष विद्धेश्वर उर्फ बंडूभाऊ गजबे, सचिव दीपकजी ढोके, मुख्य शाखा संघटक भागवतजी पाटील, शाखा संघटक विकास सोमकुवर, महिला प्रमुख संध्याताई सहारे, ज्येष्ठ संघटक कांताताई गजबे, संघटक संगीताताई निकोसे तसेच संघटक अनिताताई मेश्राम यांची उपस्थिती होती.

पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नव्याने प्रवेश घेतलेल्या महिला सैनिकांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर डोरली (भांडवलकर) शाखेसाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष व संघटक पदांची निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प व्यक्त केला.

महिलांचा वाढता सहभाग आणि गावपातळीवर संघटनात्मक बांधणी यामुळे डोरली (भांडवलकर) शाखेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांना चालना मिळणार असल्याचे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
📲Get App