🔥 TRENDING Congress Delegation Visits Jamui Over... Nitish Kumar Nominates Neeraj for Biha... Seven women drown at Maner’s Ganga gha... Congress Flags Repeated Power Outages... Lok Sabha Chairman Om Birla Arrives in... Star Actor Donates Ramayana Film Proce...
23 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

डॉ. अनिकेत मेस्त्री यांचा मुंबई ते रायगड दौरा: गणरायाच्या दर्शनासोबत पदाधिकाऱ्यांशी स्नेहभेटी

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 23 Sep 2026, 05:24 PM 👁 12
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक व संघटनात्मक कार्यात सक्रिय असलेले डॉ. अनिकेत मेस्त्री यांनी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवा ग्रुप फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक व संघटनात्मक कार्यात सक्रिय असलेले डॉ. अनिकेत प्रदीप मेस्त्री यांनी मुंबईसह रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी देवा ग्रुप फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी प्रत्यक्ष भेटी घेतल्या तसेच गणेशोत्सवाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली.

डॉ. मेस्त्री यांनी मुंबई, खोपोली, पेन, चोंढी, अलिबाग, रेवदंडा, आक्षी, मुरुड, रोहा, निडि, वाकण आणि नागोठणे या परिसरात दौरा केला. या दौऱ्यात विविध ठिकाणी विराजमान असलेल्या गणरायाचे दर्शन घेत त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकाऱ्यांशी स्नेहपूर्ण संवाद साधला. मुंबई दौऱ्यात लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि मुंबईचा महाराजा यांचे दर्शन घेऊन त्यांनी गणरायाचे आशीर्वाद घेतले.

त्यानंतर रायगड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये देवा ग्रुप फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी भेट देत गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. मुरुड येथे श्री. मनोहर गुरव, श्री. रुपेश जामकर, श्री. रुपेश पाटील आणि श्री. प्रवीण बैकर या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या घरी डॉ. मेस्त्री यांनी सदिच्छा भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी पदाधिकाऱ्यांशी संघटनात्मक कार्य, सामाजिक उपक्रम तसेच आगामी जनहिताच्या विविध उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.

दरम्यान, मुरुड पोलीस ठाण्यात विराजमान करण्यात आलेल्या गणपती बाप्पाचेही डॉ. मेस्त्री यांनी दर्शन घेतले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या या दौऱ्यात भक्ती, स्नेह आणि संघटनात्मक संवाद यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला. या उपक्रमाने देवा ग्रुप फाउंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
📲Get App