🔥 TRENDING Four‑lane Jaunpur Bypass project launc... Government hikes windfall tax on diese... Ashok Kumar Singh Appointed New Direct... ASI Suspended After Alleged Assault on... World’s Largest Hanuman Gada Under Con... બારડોલી ખાતે કિસાન અધિકાર ધરણા કાર્યક્...
31 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून दोन शेतमजुरांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

✍️ Reporter: Doctor:PINTU PAUL 🗓 31 Oct 2026, 08:20 PM 👁 13
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून दोन शेतमजुरांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

प्रेस नोट

चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून दोन शेतमजुरांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

चंद्रपूर | प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन शेतमजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनांमुळे परिसरात शोककळा पसरली असून शेतकरी व शेतमजूर वर्गातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागभीड तालुक्यातील किटाळी बोरमाळा परिसरात शेतात काम करत असताना अचानक वीज कोसळल्याने शेतमजूर अविनाश उईके यांचा मृत्यू झाला.

दुसरी घटना वरोरा तालुक्यातील मकसूर येथील शेतात घडली. शेतात काम करत असताना वीज कोसळल्याने रावबा मंगाम यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

एकाच जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या घटनांमुळे शेतमजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही शेतमजुरांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, ही प्रार्थना.

प्रशासनाकडे मागणी : मृतांच्या कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार तातडीने आर्थिक मदत व आवश्यक शासकीय लाभ उपलब्ध करून द्यावेत.
📲Get App