🔥 TRENDING Police nab five suspects in advocate m... Delhi Court Seeks Police Report on Cus... Angel Tetarbe Honoured with Internatio... Emmys to Stream Premier Television Awa... Emmys to Shift to Amazon Prime Video S... Short Film Premiere Scheduled in Marqu...
07 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

चिपळूण-कराड मार्गावर १० लाखांहून अधिक किमतीचा गुटखा जप्त, 'मिशन फिनिक्स' अंतर्गत कारवाई

✍️ Reporter: Dr.Aniket Mestri 🗓 01 Oct 2026, 10:34 AM 👁 52
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

रत्नागिरी पोलिसांनी 'मिशन फिनिक्स' मोहिमेअंतर्गत चिपळूण-कराड महामार्गावर मोठी कारवाई करत १० लाखांहून अधिक किमतीचा बेकायदेशीर गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत एक वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे.

रत्नागिरी पोलीस दलाने अवैध धंदे आणि अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सुरू केलेल्या ‘मिशन फिनिक्स’ या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने चिपळूण-कराड महामार्गावर मोठी कारवाई केली आहे. गस्त घालताना संशयित वाहनाची झडती घेतली असता, त्यातून बेकायदेशीरपणे वाहतूक केला जाणारा लाखो रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पान मसाला जप्त करण्यात आला. या कारवाईत आरोपीसह गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा एकूण १० लाख १५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

जिल्ह्यात अवैध तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व वाहतूक रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चिपळूण-कराड मार्गावर पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी एका संशयित वाहनाची हालचाल टिपून पोलिसांनी ते तात्काळ अडवले. तपासणीदरम्यान, या वाहनातून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि पान मसाला अवैधरीत्या नेला जात असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी संबंधित आरोपीला जागेवरच ताब्यात घेतले असून, संपूर्ण मुद्देमाल सील करण्यात आला आहे. ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व त्यांच्या पथकातील अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या या कठोर कारवाईमुळे महामार्गावरून गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
📲Get App