स्थानीय
चिचपल्ली येथे पेट्रोल पंपासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली गावात हिंदुस्तान पेट्रोलियम पेट्रोल पंपाच्या अगदी समोर असलेल्या पप्पी द ढाबा परिसरात आज सकाळी ११ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पप्पी द ढाबा येथील एका कर्मचाऱ्याच्या निदर्शनास हा मृतदेह आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आवश्यक तपासणी केली. मृत व्यक्तीच्या कपड्यांची तपासणी केली असता त्याच्याकडे ओळख पटविण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही ओळखपत्र किंवा कागदपत्र आढळून आले नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
त्यामुळे मृत व्यक्ती नेमकी कोण आहे, ती कुठल्या गावची किंवा शहराची रहिवासी आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मृत्यूचे नेमके कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांकडून मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासह पुढील तपास सुरू आहे.
नागरिकांना आवाहन : सदर अज्ञात व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा व्यक्तीची ओळख पटत असल्यास त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा आणि पोलिसांना सहकार्य करावे.