🔥 TRENDING Bengal's First Tiger Relocation: Tigre... Jharkhand NEET UG 2026: Allotment Lett... Jharkhand High Court Overturns Mutual... आगरा में पानी के विवाद में महिला पर डं... Court Grants Interim Maintenance Suo M... రామగిరి ఖిల్లాకు రోవ్వే మంజూరు చేయించి...
26 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

बारामतीत वनपाल लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात; ६ हजारांची लाच स्वीकारताना कारवाई

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 26 Oct 2026, 04:15 PM 👁 31
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

वनपालाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. जाहिर शिरा शेख (वय ४७) असे कारवाई करण्यात आलेल्या वनपालाचे नाव

बारामतीत वनपाल लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात; ६ हजारांची लाच स्वीकारताना कारवाई

तक्रारदाराच्या कामासाठी १० हजारांची मागणी; यापूर्वी ४ हजार रुपये घेतल्याचा आरोप

पुणे जिल्हा प्रतिनिधी : 26 ऑक्टोबर 2026
बारामती परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई करत वन विभागातील एका वनपालाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. जाहिर शिरा शेख (वय ४७) असे कारवाई करण्यात आलेल्या वनपालाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या कामासाठी आरोपी वनपालाने स्वतःसह अन्य व्यक्तीसाठी एकूण १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यापैकी ४ हजार रुपये यापूर्वीच स्वीकारण्यात आले होते, तर उर्वरित ६ हजार रुपयांची मागणी केली जात होती.

याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. पडताळणीनंतर २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान आरोपी वनपालाला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे वन विभागातील Case लाचखोरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, शासकीय कामांसाठी लाचेची मागणी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा या कारवाईतून मिळत आहे.
📲Get App