🔥 TRENDING Delhi records lowest October maximum t... 31 अक्टूबर से वाराणसी-दिल्ली के बीच दौ... Delhi Court to Deliver Verdict on Comp... Maharashtra extends deadline for voter... অবৈধ মদ পাচার সন্দেহে গাড়ি ধাওয়ায় শ... ମାଲକାନଗିରି ଜିଲ୍ଲାର ୫୨ ହଜାରରୁ ଅଧିକ ଚାଷୀ...
30 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Weather

बळीराजासह फटाके व्यापारी संकटात! मुरबाड, सरळगाव आणि धसई विभागात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग; मोठी तारांबळ.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 30 Oct 2026, 09:56 PM 👁 47
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
💥 बळीराजासह फटाके व्यापारी संकटात! मुरबाड, सरळगाव आणि धसई विभागात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग; मोठी तारांबळ
नीड २४ न्यूज महाराष्ट्र
दिनांक: ३० ऑक्टोबर २०२६
विशेष प्रतिनिधी, काशिनाथ देसले ठाणे.
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड.
मुरबाड/सरळगाव:दिनांक ३१/१०/२०२६.
मुरबाड: मुरबाड तालुक्यासह सरळगाव आणि धसई विभागात आज (३० ऑक्टोबर) संध्याकाळच्या सुमारास अचानक आलेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे सर्वत्र एकच गोंधळ आणि दाणादाण उडाली. ऐन दिवाळीच्या तोंडावर आलेल्या या संकटामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्गाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
हाता तोंडाशी आलेला घास गेला; खळ्यातील पिके भिजली
सध्या तालुक्यात भात कापणी आणि मळणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी कापून ठेवलेली पिके आणि मळणीसाठी खळ्यात गोळा करून ठेवलेले धान्य या अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे भिजले आहे. अनेक ठिकाणी कापलेले भात शेतात साचलेल्या पाण्यात तरंगत असल्याचे भीषण चित्र आहे. यामुळे पिके कुजण्याची शक्यता निर्माण झाली असून बळीराजा हवालदील झाला आहे.
फटाके बाजारात तारांबळ; लाखो रुपयांचा माल पाण्यात
दिवाळी सणासाठी सरळगाव, धसई आणि मुरबाड बाजारपेठेत फटाक्यांचे भव्य स्टॉल्स उभारण्यात आले होते. मात्र, आज अचानक पाऊस सुरू झाल्याने फटाके विक्रेत्यांची एकच पळापळ आणि तारांबळ उडाली. पाऊस इतका वेगवान होता की दुकानदारांना माल सुरक्षित ठिकाणी हलवण्याची संधीच मिळाली नाही. दुकानांमध्ये पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे फटाके भिजून निकामी झाले आहेत. सणाच्या तोंडावर झालेल्या या अतोनात नुकसानामुळे व्यापारी वर्ग पुरता कोलमडला आहे.
या अवकाळी आपत्तीमुळे तालुक्यात तत्काळ पंचनामे करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आता शेतकरी आणि स्थानिक व्यापाऱ्यांमधून केली जात आहे.
📲Get App