🔥 TRENDING US Senate to Vote on Landmark CLARITY... Gujarat Samachar launches official You... Ashwini Vaishnaw Inaugurates Four Gati... मथुरा में 12 करोड़ रुपये की ज्वैलरी चो... સાણંદ બ્રેકિંગ ન્યૂઝ... અમદાવાદ જિલ્લ... गणेश पूजा महोत्सव में पत्रकारों को किय...
15 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

बेळगावात गणपती आगमनाच्या रात्री फ्रिजचा स्फोट; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 15 Sep 2026, 09:28 PM 👁 16
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

कर्नाटकातील बेळगावात सोमवारी मध्यरात्री घरातील फ्रिजचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

कर्नाटकातील बेळगावात गणपती आगमनाच्या रात्रीच एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. सोमवारी मध्यरात्री सुमारे २.१५ वाजता घरातील फ्रिजचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील भारती धमोने (५०), शारदा धमोने (४५), गंगा धमोने (२५) आणि प्रिया धमोने (२४) या चौघांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत गजानन धमोने (६५) आणि रोशन धमोने (२१) हे गंभीररित्या भाजले असून, दोघांना सुमारे ६० टक्के भाजले असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, धमोने कुटुंबीयांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. रात्री जेवण झाल्यानंतर कुटुंबातील सर्वजण झोपले होते. मध्यरात्री शेजाऱ्यांना मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर घरातून आगीच्या ज्वाळा दिसल्या. शेजाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेत गजानन आणि रोशन यांना घराबाहेर काढण्यात यश मिळवले. मात्र, आगीने काही वेळातच संपूर्ण घराला वेढल्याने अन्य चार जणांना बाहेर पडता आले नाही.

प्राथमिक तपासात फ्रिजचा स्फोट झाल्यानंतर घरात आग लागल्याचे समोर आले आहे. घराच्या छतावरील पत्रा स्फोटामुळे मोडला असून अनेक मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या आहेत. गणपतीच्या मूर्तीभोवती लाईट्स लावण्यात आल्या होत्या, त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. मात्र, फ्रिजचा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे.

मृत शारदा या गजानन यांच्या पत्नी, तर भारती या त्यांच्या बहिणी होत्या. गंगा आणि प्रिया या गजानन-शारदा यांच्या मुली, तर रोशन हा त्यांचा मुलगा आहे. गजानन सुतारकाम करत होते, तर कुटुंबातील इतर सदस्य मेहनत-मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पाचे घरी आगमन केलेल्या धमोने कुटुंबावर गणेश चतुर्थीच्या रात्रीच हे भीषण संकट कोसळल्याने नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मार्केट पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
📲Get App