🔥 TRENDING જુનાગઢમાં શેરખાન ડીમેટ એકાઉન્ટમાંથી ૭૧... Bihar CM Samrat Chaudhary Approves Two... BJP appoints Manvendra Singh Parihar a... Nationwide Bank Strike to Shut 297 Ujj... School Education Dept appoints 618 in... Reservation lottery for 2026 Dausa Pan...
23 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Jobs & Career

बँक कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर रविवारीही बँका सुरू राहणार

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 23 Sep 2026, 04:16 PM 👁 15
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

बँक कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी २७ सप्टेंबर रोजी देशभरातील बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्वसाधारणपणे रविवारी बँकांना साप्ताहिक सुट्टी असते. मात्र, येत्या २७ सप्टेंबर रोजी देशभरातील बँका सुरू राहणार आहेत. बँक कर्मचारी संघटनांनी २८, २९ आणि ३० सप्टेंबर रोजी तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे. या संपामुळे सलग तीन दिवस बँकिंग व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे ग्राहकांना आवश्यक बँकिंग सेवा उपलब्ध व्हाव्यात आणि संपाच्या काळात होणारी गैरसोय काही प्रमाणात टाळता यावी, यासाठी २७ सप्टेंबर रोजी रविवारीही बँकांचे कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी राष्ट्रीयकृत, प्रादेशिक तसेच ग्रामीण बँकांचे कामकाज सुरू राहणार असल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

संपाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी रविवारी उपलब्ध असलेल्या बँकिंग सेवांचा आवश्यकतेनुसार लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
📲Get App