🔥 ट्रेंडिंग कर्नाटक SET 2026 होल टिकट आज जारी कर्नाटक ने शुरू की पॉइंट‑आधारित ड्राइव... राजस्थान उच्च न्यायालय ने 3,000 मादरास... जयपुर को दिसंबर तक कदम न उठाने पर यूने... उदायपुर के पास मानसून पीछे हटेगा, पश्च... तमिलनाडु के बांधों में 34% जल भंडारण,...
01 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

भुसावळ तालुक्यात ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली....!

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Dixit 🗓 01 अक्टू. 2026, 12:28 PM 👁 18
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील दीपनगरजवळील कपिलवस्ती परिसरात आज बुधवार, दि. ३० सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. भुसावळच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून चालक श्रीविलास जखमी झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, एमएच ०५ डीके ०६७४ क्रमांकाचा ट्रक धुळे जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक महामार्गावर पलटी झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी चालकास तात्काळ ग्रामीण रुग्णालय, वरणगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघातग्रस्त ट्रक जर कपिलवस्ती वस्तीच्या दिशेने गेला असता तर मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता होती. मात्र ट्रक वस्तीपासून दूर राहिल्याने मोठा अनर्थ टळला.

दीपनगर-कपिलवस्ती हा महामार्गालगतचा परिसर असून येथे सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. महामार्गावरील भरधाव वेग, रस्त्याची दुरवस्था आणि सुरक्षेच्या उपाययोजनांकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. तसेच वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
📲Get App