🔥 TRENDING श्योपुर के ग्राम बिजरपुर में बदहाल सड़... ICAI Releases CA Foundation September... Kochi Mercedes Crash Victim's Daughter... Wall Street Slump: $2.5 Trillion Wiped... Ponnur Youth Killed in US Road Acciden... Jharkhand Police Investigate Brutal Mu...
06 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

भोर तालुक्यात दोन अल्पवयीन चुलत भावांकडून अल्पवयीन चुलत बहिणीवर अत्याचार... नात्याला काळीमा लावण्याची घटना

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 25 Oct 2026, 05:34 PM 👁 52
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
भोर न्यूज प्रतिनिधी – भोर तालुक्यात दोन अल्पवयीन चुलत भावांकडून अल्पवयीन चुलत बहिणीवर अत्याचार केल्याने अल्पवयीन १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. दरम्यान अल्पवयीन मुलीच्या पुणे ससून रुग्णालयातील प्रसूतीनंतर प्रकरण उघडकीस आल्याने भोर तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली असून बहीण भावांच्या नात्यांमध्ये काळीमा फासणारी घटना घडल्याने तालुक्यात सर्वदूर संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित घटनेची फिर्याद १६ ऑक्टोबरला अल्पवयीन मुलीने भोर पोलिसात दिली.

भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या दोन चुलत भावांनी पीडित अल्पवयीन मुलीवर जानेवारी २०२६ मध्ये बळजबरीने माळरानावर अत्याचार केला. दरम्यान पीडित अल्पवयीन मुलगी घाबरल्याने हा प्रकार आजतगायत कोणालाही सांगितला नव्हता. मात्र अल्पवयीन पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार समोर आला. पीडित मुलगी ससून रुग्णालय येथे उपचारासाठी गेली असता पीडीतेची प्रसूती झाली. ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भोर पोलीस स्टेशनसी संपर्क करून संबंधित घटनेची माहिती दिली. दरम्यान भोर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी ससून रुग्णालयात तात्काळ दाखल होऊन पीडित मुलीचे जाबजबाब नोंदविले. पीडितेची फिर्याद दाखल करून घेतली असून भोरचे पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.
📲Get App