🔥 TRENDING आठ महीने से पानी का तरस रही ए एन एम इस... Punjab Ends Power Cuts After Resolving... Punjab Police Arrest 10 in Jalandhar G... Three suspects arrested after veterina... Millions in cash and jewellery stolen... CM Samrat Chaudhary Announces Two-Day...
14 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
भोकरदनमधील बिकानेर महावीर स्वीट्समध्ये विकल्या जाणाऱ्या बर्फीत आढळल्या अळ्या
Local

भोकरदनमधील बिकानेर महावीर स्वीट्समध्ये विकल्या जाणाऱ्या बर्फीत आढळल्या अळ्या

✍️ Reporter: Vishnu Pawar 🗓 23 Aug 2026, 10:18 AM 👁 34
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

भोकरदन तालुक्यातील बिकानेर महावीर स्वीट्स या दुकानातून खरेदी केलेल्या बर्फीमध्ये अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

भोकरदन तालुक्यात असलेल्या बिकानेर महावीर स्वीट्स या मिठाईच्या दुकानातून खरेदी केलेल्या मिठाईच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रकार समोर आला आहे. ग्राहकाने खरेदी केलेल्या बर्फीमध्ये अळ्या आढळून आल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ग्राहकाने बिकानेर महावीर स्वीट्समधून बर्फी विकत घेतली होती. मात्र, घरी नेल्यानंतर मिठाईचे बॉक्स उघडले असता त्यात अळ्या असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे मिठाईच्या स्वच्छतेवर आणि गुणवत्तेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सण-उत्सवाच्या काळात मिठाईची मागणी मोठ्या प्रमाणात असते. अशा वेळी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा प्रकारांमुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित मिठाईच्या दुकानावर प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
📲Get App