🔥 TRENDING પાલિતનામાં દિવાળી પર ટ્રાફિક જામ, મુલા... Bhayander Youth Killed in Illegal Liqu... Amit Shah Challenges Rahul Gandhi to S... Indian Americans Secure Key Wins in 20... Sonowal slams Congress for promoting c... India vs Nepal U19 Asia Cup: Squads An...
06 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
भडगावमध्ये पावसाने शेतकऱ्यांना दिला समाधानाचा आधार
Agriculture

भडगावमध्ये पावसाने शेतकऱ्यांना दिला समाधानाचा आधार

✍️ Reporter: Vilas Supadu Patil 🗓 13 Jul 2026, 12:35 PM 👁 201
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

मागील आठवड्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना समाधानाचा आधार दिला आहे, खरीप पूर्व कपाशी मका लागवड केलेले पीक जोमात येत आहे. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून बैल जोडी मालक व शेतमजुरांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे.

मागील आठवड्यात सलग तीन ते चार दिवस कमी जास्त मध्यम स्वरूपाचा चांगला समाधान कारक पाऊस झाल्याने शेती कामांना वेग दिसत आहे. खरीप पूर्व कपाशी मका लागवड केलेले पीक जोमात येत आहे. गिरणा परिसरातील अनेक गावात यावर्षी 25 मे पासून विहिरीच्या पाण्यावर ठिबक सिंचनाच्या साह्याने कपाशी मोठी लागवड झाली आहे.

तीन दिवसापासून पावसाने उघडकीप दिल्याने पिकांचे अंतर मशागत निंदनी कोळपणी खुरपणी रासायनिक खतांचा पहिला डोस काही ठिकाणी कपाशीवर कीटकनाशक फवारणीचे कामे सुरू आहेत. तो परिसरातील बागायती असल्याने अंतर मशागतीचे कामे जोरात सुरू आहेत. संपूर्ण शिवारात सध्या शेतीकामाची लगबग पाहायला मिळत आहे.

समाधानकारक पावसामुळे खरीप पिकांना मोठा आधार मिळाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून बैल जोडी मालक व शेतमजुरांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. शेतकऱ्यांना पावसाची वाट न पाहणे पडल्याने ते आपली शेती कामे पूर्ण करू शकत आहेत.

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे, कारण पावसाने त्यांच्या पिकांना योग्य वाढीसाठी लागणारे पाणी पुरवले आहे. आता शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून न राहता ते आपली शेती कामे सुरू ठेवू शकतात.
📲Get App