भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे चारा साक्षरता अभियान कार्यक्रम संपन्न
यहाँ देखें:
▶️ YouTube
70ते80पशुपालकांना चारा बियाणे वाटप करण्यात आले
गोंडगाव येथे 'चारा साक्षरता अभियान' व चारा बियाणे वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न
जिल्हा प्रतिनिधी विलास पाटील भडगाव
गोंडगाव येथे पशुपालकांसाठी आयोजित करण्यात आलेला चारा बियाणे वाटप कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडला. याप्रसंगी गावचे सन्माननीय सरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि इतर मान्यवर आवर्जून उपस्थित होते....
पशुधनाचे उत्तम आरोग्य आणि दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी दर्जेदार आणि पौष्टिक चाऱ्याची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची असते. याच अनुषंगाने काल गावातील ७० पेक्षा अधिक पशुपालकांना चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
तळागाळातील आणि शेवटच्या घटकापर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्याच्या माझ्या प्रयत्नांची दखल घेत, ग्रामपंचायत गोंडगाव येथे सन्माननीय सरपंचांच्या हस्ते माझा विशेष सत्कार करण्यात आला. हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत मोलाचा असून, यामुळे शेतकरी आणि पशुपालकांसाठी अविरत काम करण्यासाठी मला नक्कीच नवी ऊर्जा मिळाली आहे.
शेतकरी आणि पशुपालकांनी या उपक्रमाला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद खरोखरच आनंददायी होता. या उपक्रमाला मोलाचे सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार!