🔥 ट्रेंडिंग કેન્દ્રીય ગૃહમંત્રી અમિત શાહ 27 ઓગસ્ટે... जम्मू-कश्मीर की शक्ति घटती रही, नेता र... एमएलए ने सर्मनास की कीचड़ वाली सड़क पर... गोवा के समुद्री भोजन को लंदन में मिला... गोवा सरकार ने जनजातियों के वन अधिकार द... अमेरिका वीज़ा न मिलने पर तेलंगाना के स...
23 अग. 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

बांबरुडच्या सुपुत्राला भारत सरकारचे 'उत्कृष्ट सेवा पदक' राज्य राखीव पोलीस दलाचे कमांडर रवींद्रसिंग परदेशी यांच्या उल्लेखनीय सेवेचा गौरव

✍️ रिपोर्टर: Vilas Patil 🗓 22 अग. 2026, 06:54 PM 👁 27
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते सर यांच्या शुभहस्ते

जळगाव (प्रतिनिधी)। विलास पाटील बांबरुड गावचे.सुपुत्र तथा राज्य राखीव पोलीस दल, पुणे येथील कमांडर रवींद्रसिंग परदेशी यांना भारत सरकारतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'उत्कृष्ट सेवा पदक' प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मान्यतेने पोलीस दलातील उल्लेखनीय सेवा, कर्तव्यनिष्ठा व प्रशासकीय कार्यासाठी त्यांन हा सन्मान जाहीर झाला आहे.

रवींद्रसिंग परदेशी हे भडगाव तालुक्यातील बांबरुड गावचे रहिवासी असून, संतोससिंग परदेशी व जिजाई परदेशी यांचे सुपुत्र आहेत. गेल्या २५ वर्षापासून ते राज्य राखीव पोलीस दलात निष्ठेने सेवा बजावत आहेत. त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धती, कर्तव्याप्रती निष्ठा आणि समाजाभिमुख दृष्टिकोनामुळे ते सहकाऱ्यांमध्ये व नागरीकांमध्ये लोकप्रिय आहेत.

त्यांच्या कार्याची दखल घेत नुकत्याच चाळीसगाव येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना पदकाने गौरविण्यात आले. याप्रसंगी अनेक वरिष्ठ पलिस अधिकारी, सहकारी व कुटुंबीय उपस्थित होते.

परदेशी यांनी आपल्या कारकिर्दीत कायदा-सुव्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन तसेच प्रशिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल बांबरुड, भडगाव व परिषरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गावकऱ्यांनी त्यांच्या यशाला 'गावचा अभिमान' असे संबोधले आहे.
📲Get App