🔥 ट्रेंडिंग हिमाचल प्रदेश ने खोला पहला गधों का फार... इंदौर के मनोरमागंज में सॉफ्टवेयर इंजीन... बड़वानी के सेंधवा में भाजपा नेता के बे... धायसर में मोहन सिंह भाटी ने 167 वोटों... ದೇವದುರ್ಗ ಜೆಡಿಎಸ್‌ಗೆ ಬಲ ತುಂಬಿದ ಮಾಜಿ ತಾಪ... நாகை துறைமுகத்தில் 1ஆம் எண் எச்சரிக்கை...
16 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

अमळनेरात पहाटे कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; ५७० किलो मांस जप्त, सात जणांविरुद्ध गुन्हा...!!

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 16 नव. 2026, 10:58 PM 👁 22
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

अमळनेर, दि. १६ : शहरातील पारधीवाडा परिसरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर पोलिसांनी पहाटे चार वाजेच्या सुमारास धडक कारवाई केली. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना या ठिकाणी जनावरांची कत्तल सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांच्यासह पथकाने घटनास्थळी छापा टाकला.

या कारवाईत पोलिसांनी ३०० किलो गोवंश मांस, १०० किलो म्हशीचे मांस आणि १७० किलो इतर जनावरांचे मांस असा एकूण ५७० किलो मांसाचा साठा जप्त केला. याशिवाय ५० किलो कातडी, शिंगे तसेच २८ कुऱ्हाडी, सुऱ्या व कोयते ताब्यात घेण्यात आले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ४४ हजार ८०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

छाप्यादरम्यान घटनास्थळावरून इक्बाल कुरेशी आणि बाबा कुरेशी या दोघांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी फरशी रोड, अमळनेर येथील शेख रमजान शेख मुख्तार, अब्दुल अजीज अब्दुल शुकूर, अल्ताफ खान अजीज खान पठाण, सलमान रजा सलीम अहमदखान, शेख मुख्तार शेख बिस्मिल्ला, इक्बाल कुरेशी आणि बाबा कुरेशी अशा एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला असून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने जप्त केलेले मांस खड्डा खणून नष्ट करण्यात आले. महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम १९७६, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत. पहाटेच्या या मोठ्या कारवाईमुळे अमळनेर शहरात एकच खळबळ उडाली असून परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
📲Get App