🔥 TRENDING कटनी: बकलेहटा में बिजली संकट से सूख रह... ગુજરાતમાં સ્થાનિક સ્વરાજ્યની ચૂંટણીના... निगोही: नाबालिग को बहला-फुसलाकर भगाने... Punjab Police Officer Injured in Encou... Drone Strike Hits Oil Tanker Near Soha... Tanker off Oman Ignites After Drone St...
13 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
अमळनेरमध्ये बंद घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद; तीन गुन्हे उघडकीस, १ लाख ८० हजारांचा ऐवज जप्त...!!!

अमळनेरमध्ये बंद घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद; तीन गुन्हे उघडकीस, १ लाख ८० हजारांचा ऐवज जप्त...!!!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 13 Oct 2026, 08:08 AM 👁 18
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

अमळनेर - शहरातील बंद घरांचे कुलूप तोडून घरफोड्या करणाऱ्या मध्यप्रदेशातील दोन सराईत आरोपींना अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली असून आरोपींकडून शहरातील तीन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकाला आरोपींबाबत महत्त्वाची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे तांत्रिक तपास करून पोलिसांनी संशयितांचा माग काढला. या कारवाईत नवलसिंह वनसिंह अलावा (वय ३९, रा. काकडवा, ता. कुक्षी, जि. धार, म.प्र.) याला तांडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले. त्याला अमळनेर येथे आणून अटक करण्यात आली.

चौकशीदरम्यान नवलसिंह याने आपला साथीदार केरू उर्फ केहरु इडीया डाबर (वय ४५, रा. बलेडी, गलबेडा फलिया, ता. जोबट, जि. अलीराजपूर, म.प्र.) याच्यासोबत मिळून अमळनेर शहरात तीन घरफोड्या केल्याची कबुली दिली. या माहितीच्या आधारे अमळनेर पोलिसांचे पथक मध्यप्रदेशात रवाना झाले आणि दुसऱ्या आरोपीस बलेडी गावातून ताब्यात घेऊन अमळनेर येथे आणून अटक केली.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी शहराबाहेरील शेत परिसरात मोटारसायकल उभी करून मध्यरात्रीनंतर बंद घरांचे कुलूप तोडून प्रवेश करत असत.

३१ जानेवारी २०२६ रोजी नदीजवळील कॉलनीत पहिली घरफोडी झाली.,
३ एप्रिल २०२६ रोजी सिमेंट काँक्रीट रस्त्याजवळील कॉलनीत दुसरी घटना घडली.
२४ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्रीनंतर त्याच परिसरातील एका बंद घराचे कुलूप तोडून आरोपींनी लोखंडी कपाटातील ५०० रुपयांच्या ५० नोटा (१० हजार रुपये रोख), देवघरातील चांदीची गणपतीची मूर्ती आणि नक्षीकाम केलेले चांदीचे लक्ष्मीचे नाणे चोरून नेले होते.

पोलिसांनी एकूण १.८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यात ९० ग्रॅम वजनाची चांदीची गणपतीची मूर्ती, २० ग्रॅमचे चांदीचे लक्ष्मीचे गोल नाणे, ५ ग्रॅम सोन्याची गोळी, ५० ग्रॅमचा चांदीचा तुकडा, चांदीच्या कड्या, सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे करदोडे आणि चांदीच्या वाळ्यांच्या जोडांचा समावेश आहे.

अशी झाली कारवाई -
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायकराव कोते आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, पोलीस नाईक सूर्यकांत साळुंखे, पोलीस कर्मचारी प्रशांत पाटील, उज्ज्वल पाटील, नितीन मनोरे, उज्ज्वलकुमार म्हस्के, नितीन कापडणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांनी सहभाग घेतला.
📲Get App