🔥 TRENDING Centre appoints Justice P Sam Koshy as... Telangana Today Examines Retirement Pl... Two New Gecko Species Found in Telanga... Odisha Student Union Election Dates An... Odisha Issues Strict Guidelines, Zero... રાજુલા પોલીસે 23 વર્ષ પછી પીપાવાવ પોર્...
06 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

अमळनेरमध्ये अवैध मुरुम वाहतुकीवर महसूलची कारवाई; दोन ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त....!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 01 Oct 2026, 09:04 PM 👁 41
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

अमळनेर - अमळनेर तालुक्यातील सडावण बुद्रुक परिसरात अनधिकृतपणे गौण खनिज मुरुमाची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कारवाई करत दोन्ही वाहने जप्त केली आहेत.

प्राप्त माहितीनुसार, सडावण बुद्रुक परिसरात विनापरवाना मुरुमाची वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे महसूल पथकाने सदर ठिकाणी पाहणी केली असता, मुरुमाची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर निदर्शनास आले. वाहनचालकांकडे वाहतुकीसाठी आवश्यक असलेली कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. त्यानंतर पथकाने दोन्ही ट्रॅक्टर-ट्रॉली ताब्यात घेऊन मुद्देमालासह तहसील कार्यालय, अमळनेर येथे जमा केले.

ही कारवाई उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे आणि तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत मंडळ अधिकारी पी. एस. पाटील (वावडे भाग) यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी जितेंद्र पाटील (शिरसाळे बु.), मुकेश देसले (पाडसे), भूषण पाटील (कळमसरे), कल्पेश कुवर (फाफोरे बु.), संदीप माळी (मांडळ), एम. आर. पाटील (जैतपीर) आणि अमोल चक्रे (जवखेडे) यांच्या पथकाने सहभाग घेतला.

गौण खनिजाच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होते. त्यामुळे अशा अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी महसूल विभागाकडून तालुक्यात गस्त आणि तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महसूल प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
📲Get App