अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी दोषी; ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!
Watch on:
▶️ YouTube
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात कामशेत पोलिसांनी केलेल्या तपासाला यश आले .
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी दोषी; ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!
कामशेत पोलिसांच्या तपासाला यश; वडगाव मावळ जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल.
कामशेत | प्रतिनिधी!
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात कामशेत पोलिसांनी केलेल्या तपासाला यश आले असून, वडगाव मावळ येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी योगेश प्रकाश सौमवंशी (वय ८६, रा. धानोरी, पुणे) याला दोषी ठरवले आहे. न्यायालयाने POCSO कायद्याच्या संबंधित कलमान्वये आरोपीला चार वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
कामशेत पोलीस ठाण्यात सन २०२३ मध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ४१/२०२३ अन्वये भारतीय दंड विधान कलम ३५४ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन तपासी अधिकारी तथा सध्या कामशेत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी असलेले सहायक पोलीस निरीक्षक आकाश पवार यांनी केला. तपासादरम्यान आवश्यक पुरावे गोळा करून प्रकरण न्यायालयात प्रभावीपणे सादर करण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न केले.
या तपासात पोलीस हवालदार आशिष झगडे यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. तसेच पोलीस हवालदार संदीप शिंदे आणि पोलीस शिपाई सौरभ गायकवाड यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.
वडगाव मावळ येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता संतोष परदेशी आणि लालचंद ओसवाल यांनी बाजू मांडली.
तसेच न्यायालयीन कामकाजासाठी वडगाव मावळ सत्र न्यायालयाचे पैरवी अंमलदार GPSI वाघमारे आणि जिल्हा न्यायालयाच्या पैरवी अधिकारी माधुरी तावरे यांनी समन्वय साधला.
पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे आणि न्यायालयीन प्रक्रियेत केलेल्या पाठपुराव्यामुळे या प्रकरणात आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निकालामुळे अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये प्रभावी तपास आणि पुराव्यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.