🔥 TRENDING Aditi Rao Hydari: Patience Over Parts,... Pakistan Fall Short in Asia Cup Final Teenage Indian Duo Mohit Ulva and Mana... India U19 Clinches Thrilling Victory O... IMD Predicts Rain, Snow, and Strong Wi... Heavy Rainfall Expected in Tamil Nadu...
15 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

अक्कलकोटमध्ये सचिन (दादा) कल्याणशेट्टी यांच्या वतीने दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन

✍️ Reporter: YALLAPPA RAGATE (PATIL) 🗓 15 Nov 2026, 05:57 AM 👁 7
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
अक्कलकोटमध्ये सचिन (दादा) कल्याणशेट्टी यांच्या वतीने दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन (दादा) कल्याणशेट्टी यांच्या वतीने अक्कलकोट तालुक्यातील कार्यकर्त्यांसाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांचे स्नेहपूर्ण स्वागत करण्यात येणार आहे.
दिवाळी हा आनंद, उत्साह, आपुलकी आणि एकमेकांशी स्नेहाचे नाते अधिक दृढ करणारा सण आहे. याच दिवाळीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये आपुलकी, एकोपा आणि सामाजिक सलोखा वाढावा, तसेच सर्व कार्यकर्त्यांना एकत्र येऊन दिवाळीचा आनंद साजरा करता यावा, या उद्देशाने या फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला अक्कलकोट तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवाळी फराळाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आमदार सचिन (दादा) कल्याणशेट्टी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचा तपशील :
कार्यक्रम : दिवाळी फराळ कार्यक्रम
आयोजक : आमदार सचिन (दादा) कल्याणशेट्टी
दिनांक : १४ नोव्हेंबर २०२६
वेळ : सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत
ठिकाण : प्रशालीच्या आवारात
अक्कलकोट तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी या दिवाळी फराळ कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
📲Get App