🔥 TRENDING CPM Leader Labels Malappuram a 'Nest o... Former Cabinet Secretary Warns: Kerala... Inter-state gang busted in Bhind for A... मझिगवां में सेवा सेतु एवं जनविश्वास शि... नागपुर की प्रमुख ताज़ा खबरें - 4 अक्टू... दंड रोड पर ट्राली दुर्घटना: कई मौतें औ...
04 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

अडावद वन विभागाची पहाटे धडक कारवाई; सागवान तस्करी उधळली, १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त....!!!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 04 Oct 2026, 07:44 PM 👁 13
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

चोपडा - अडावद वनविभागाच्या फिरत्या पथकाने पहाटेच्या सुमारास केलेल्या धडक कारवाईत सागवान लाकूड तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. बोरमळी ते अडावद पाटचारी रस्त्यावर झालेल्या या कारवाईत वन विभागाने पाच विना क्रमांकाच्या मोटारसायकली आणि सागवानी अनघड बेलन असा एकूण १ लाख ६० हजार ६२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वन कर्मचाऱ्यांना पाहताच पाचही संशयित तस्कर वाहने व लाकूड रस्त्याच्या कडेला टाकून पसार झाले.

प्राप्त माहितीनुसार, दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास वनरक्षक आर. एस. निकुंभे यांना सागवानी लाकडाची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहिती मिळताच वनपाल योगेश साळुंखे यांनी अडावद राऊंडच्या पथकासह बोरमळी - अडावद पाटचारी रस्त्यावर संयुक्त गस्त सुरू केली.

गस्त सुरू असताना विना नंबरच्या पाच मोटारसायकलींवरून काही संशयित इसम सागवानी बेलनांची वाहतूक करत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथकाने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता, वन विभागाचे पथक जवळ येत असल्याचे लक्षात येताच तस्करांनी मोटारसायकली व लाकूड जागीच टाकून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून धूम ठोकली. वन विभागाने तात्काळ सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला.

जप्त वाहनांमध्ये दोन काळ्या रंगाच्या सीबी शाईन (प्रत्येकी ३० हजार रुपये), एक तपकिरी रंगाची सीबी शाईन (३० हजार रुपये) आणि दोन काळ्या रंगाच्या हिरो स्प्लेंडर प्लस (प्रत्येकी २५ हजार रुपये) अशा पाच मोटारसायकलींचा समावेश आहे. या वाहनांची एकूण किंमत १ लाख ४० हजार रुपये आहे.

तर विविध आकाराचे १ हजार २५ नग सागवानी अनघड बेलन जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत २० हजार ६२५ रुपये आहे. असा एकूण १ लाख ६० हजार ६२५ रुपयांचा मुद्देमाल चोपडा येथील शासकीय मुद्देमाल केंद्रात जमा करण्यात आला आहे.

या प्रकरणी वनरक्षक आर. एस. निकुंभे यांच्या फिर्यादीवरून गु. नोंद क्र. ०७/२०२६, दि. ३ ऑक्टोबर २०२६ अन्वये वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार झालेल्या पाचही संशयितांचा शोध सुरू असून जप्त लाकडाचा स्रोत, तस्करीचे ठिकाण आणि या रॅकेटमागील इतर सूत्रधारांचा तपास वनपाल योगेश साळुंखे करीत आहेत.

सदरची कारवाई उप वनसंरक्षक, यावल वन विभाग सौरिष सहाय, सहाय्यक वनसंरक्षक, चोपडा एम. बी. पाटील आणि वनक्षेत्रपाल, अडावद प्रशांत साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत वनपाल योगेश साळुंखे, वनरक्षक राकेश निकुंभे, वनमजूर संजय बेलदार, प्रकाश सपकाळे, बापू कोळी, संजय तडवी, योगेश सपकाळे, राजेश जोशी, हर्षल जोशी, भिक्कन तडवी, इतबार तडवी आदींनी सहभाग घेतला.
📲Get App