Local
आंतरराष्ट्रीय लावणी सम्राज्ञी राजश्री काळे-नगरकर यांच्या कौटुंबिक विवाह सोहळा
या सोहळ्याला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी विशेष उपस्थिती
आंतरराष्ट्रीय लावणी सम्राज्ञी राजश्री काळे-नगरकर यांच्या कौटुंबिक विवाह सोहळ्यानिमित्त अहिल्यानगर येथे कला, साहित्य आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली. या निमित्ताने राज्यातील नामवंत लावणी कलावंत, वादक आणि लोककला अभ्यासक एकत्र आल्याने या दिमाखदार विवाह सोहळ्याला जणू एका भव्य लोककलावंत मेळाव्याचेच स्वरूप प्राप्त झाले होते.
या सोहळ्याला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी विशेष उपस्थिती लावून वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. तसेच लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाशजी खांडगे सर व डॉ. सौ. खांडगे मॅडम, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे सहकुटुंब यांनीही आवर्जून हजेरी लावली.
लावणी आणि संगीत क्षेत्रातील दिग्गजांमध्ये अकलूज लावणी महोत्सव विजेत्या लावणीसम्राज्ञी रेश्मा मुसळे-परितेकर, ज्येष्ठ कलावंत प्रमिला लोदगेकर, माया खुटेगावकर, विजया कदम आणि सर्वांचे लाडके आंतरराष्ट्रीय ढोलकीवादक कृष्णा मुसळे दादा यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. यासोबतच 'तृप्ती फिल्म प्रोडक्शन'चे निर्माते रामदासजी राऊत व त्यांचे सहकारी बाबाजी कोरडे यांनीही या सोहळ्याला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
अनेक दर्जेदार कलावंत आणि मान्यवरांच्या स्नेहमेळाव्यामुळे हा विवाह सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.