🔥 TRENDING खाकी वर्दीला लाचेचा डाग! लोणावळ्यातील... Farooq Abdullah Forms National Confere... Dr. Sajjan Singh Yadav to Assume Role... डिस्ट्रिक्ट कन्नड़ लिटरेरी कॉन्फ्रेंस... Congress councillors demand action aft... अध्यापक नरपत सिंह अवाय ने आंगनवाड़ी कार...
17 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Politics

आमदार राजेंद्र राऊत, पृथ्वीराज माने, यशवंत शिंदे, श्रीदीप हसापुरे, शंभूराज जगताप, बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील, सिद्धेश्वर आवताडे बिनविरोध ; तीन आमदारांची या निवडणुकीतून माघार

✍️ Reporter: Suhas Tagare 🗓 17 Nov 2026, 07:27 PM 👁 19
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

आमदार राजेंद्र राऊत, पृथ्वीराज माने, यशवंत शिंदे, श्रीदीप हसापुरे, शंभूराज जगताप, बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील, सिद्धेश्वर आवताडे बिनविरोध ; तीन आमदारांची या निवडणुकीतून माघार

ब्रेकिंग : आमदार राजेंद्र राऊत, पृथ्वीराज माने, यशवंत शिंदे, श्रीदीप हसापुरे, शंभूराज जगताप, बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील, सिद्धेश्वर आवताडे बिनविरोध ; तीन आमदारांची या निवडणुकीतून माघार

संपूर्ण जिल्हा आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या.

या निवडणुकीत उत्तर सोलापूर तालुका सोसायटी मतदार संघातून पृथ्वीराज माने दक्षिण सोलापूर तालुका सोसायटी मतदारसंघातून श्रीदीप हसापुरे करमाळा सोसायटी मतदारसंघातून शंभूराज जगताप आणि माढा सोसायटी मतदारसंघातून यशवंत शिंदे तर इतर मागास प्रवर्ग या मतदारसंघातून अजिंक्यराणा पाटील हे बिनविरोध झाले आहेत. संपूर्ण उत्तर तालुक्याचे लक्ष लागलेल्या सोसायटी मतदारसंघातून एकदम शेवटी म्हणजेच तीन वाजता बाबासाहेब पाटील हे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आले आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यामुळे पृथ्वीराज माने बिनविरोध झाले आहेत.

यापूर्वीच मोहोळ सोसायटीतून बाळराजे पाटील बार्शीतून आमदार राजेंद्र राऊत मंगळवेढ्यातून सिद्धेश्वर आवताडे हे बिनविरोध झाले होते. या निवडणुकीतील मोठी घडामोड म्हणजे राज्याचे माजी सरकार मंत्री आमदार सुभाष देशमुख आणि पंढरपूर मंगळवेढा आमदार समाधान आवताडे आणि माढाचे आमदार अभिजीत पाटील यांनी कृषी व पणन मधून या निवडणुकीतून माघार घेतली आहे.

इतर मागास प्रवर्ग या मतदारसंघातून अजिंक्यराणा पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता, दिवसभर अजिंक्यराणा पाटील हे जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ठाण मांडून होते उमेदवारी काढायला आलेल्या प्रत्येकांचे त्यांनी आदरपूर्वक आशीर्वाद घेतल्याचे दिसून आले.

करमाळ्यातून शंभूराज जगताप यांच्यासाठी सुभाष गुळवे यांनी माघार घेतली. दक्षिण सोलापूर मधून श्रीदीप हसापुरे यांच्यासाठी भारती राजशेखर शिवदारे सूचकाद्वारे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतले.
उत्तर तालुक्यातून पृथ्वीराज माने यांच्यासाठी बाबासाहेब पाटील यांनी माघार घेतली.
माढा तालुका यशवंत शिंदे यांच्यासाठी भारत शिंदे, गणपतराव साठे यांची माघार घेतली.
📲Get App