🔥 ट्रेंडिंग ಸರ್ಕಾರಿ ಕನ್ಯಾ ಪ್ರೌಢಶಾಲೆಯ 10ನೇ ತರಗತಿ ವಿ... बाबूबरही में असिस्टेंट सब-इंस्पेक्टर च... रिको इशिदा और काना कुराशिना के साथ 'क्... एनएचएम ने मातृत्व एवं शिशु स्वास्थ्य स... CII ने मैन्युफैक्चरिंग में महिला नेताओ... 3M ने 7.4 बिलियन डॉलर के रासायनिक चोट...
04 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मनोरंजन

आमदार किसनजी कथोरे यांच्या संकल्पनेतून मुरबाडमध्ये १००० आदिवासी महिलांचा 'भाऊबीज' भेट देऊन सन्मान!

✍️ रिपोर्टर: Kashinath Desale 🗓 04 नव. 2026, 09:16 AM 👁 15
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
नीड २४ न्युज
दिनांक: ४/११/२०२६
मुरबाड विशेष वृत्त

आमदार किसनजी कथोरे यांच्या संकल्पनेतून मुरबाडमध्ये १००० आदिवासी महिलांचा 'भाऊबीज' भेट देऊन सन्मान!
जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले ठाणे.
तालुका प्रतिनिधी किशोर पवार मुरबाड
दिनांक ४/११/२०२६.
विशेष वृत्त
मुरबाड (प्रतिनिधी):
मुरबाड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि विकासपुरुष आदरणीय श्री. किसनजी कथोरे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि सेवा संकल्प अभियानांतर्गत मुरबाड तालुक्यात एक अत्यंत स्तुत्य आणि भावनिक उपक्रम राबवण्यात आला. तालुक्यातील दुर्गम भागातील १००० हून अधिक आदिवासी भगिनींना भाऊबीजेची विशेष भेट देऊन त्यांचा जाहीर सन्मान करण्यात आला.
'मानवसेवा सामाजिक संस्था, मुरबाड' आणि 'रोटरी क्लब ग्रामीण डोंबिवली' यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रम शिरवली मानिवाली या ठिकाणी आयोजित केला होता.
आमदार किसनजी कथोरे साहेबांची संकल्पना ठरली दिशादर्शक
समाजातील अंतिम घटकातील आणि कष्टकरी आदिवासी भगिनींच्या जीवनात दिवाळी व भाऊबीजेचा सण खऱ्या अर्थाने आनंद घेऊन यावा, या उदात्त विचारातून आमदार किसनजी कथोरे साहेबांनी या उपक्रमाची संकल्पना मांडली होती. त्यांच्या याच जनहितैषी संकल्पनेला मूर्त रूप देत, मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि मानवसेवा संस्थेचे अध्यक्ष सुरेश नारायण बांगर (सर) यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके व भव्य आयोजन केले.
आदर व आपुलकीचा सन्मान सोहळा
या सोहळ्या दरम्यान उपस्थित सर्व १००० आदिवासी महिलांना भाऊबीजेची ओवाळणी आणि उपयुक्त भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. आपल्या हक्काच्या भावाकडून मिळालेल्या या मायेच्या भेटीमुळे अनेक आदिवासी भगिनींच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद आणि समाधान दिसून आले.
या कार्यक्रमाला मुरबाड नगरपंचायतीचे लोकप्रतिनिधी, नगरसेवक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नामांकित व्यक्ती, तसेच मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ आणि दोन्ही संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार किसनजी कथोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या ऐतिहासिक आणि कौटुंबिक जिव्हाळ्याच्या भाऊबीज सोहळ्याचे संपूर्ण मुरबाड तालुक्यातून अत्यंत कौतुक होत आहे.
- नीड २४ न्युज, मुरबाड ब्यूरो.
📲Get App