🔥 TRENDING ધનતેરસ પહેલાં સોનું‑ચાંદીના ભાવમાં ઘટવ... விழுப்புரத்தில் 'விளைநிலம் காப்போம்' வ... निवाई बाईपास पर गहरे गड्ढे से आमजन को... ગુજરાત યુનિવર્સિટીના હોસ્ટેલમાં એન્ટી-... सालमारी रेलवे स्टेशन के बाहर शनिवार को... ਸਮਾਜ ਸੇਵੀ ਕਮਲ ਚੌਹਾਨ ਟੇਢੇਵਾਲ ਨੇ ਨਵੀਂ ਦਿ...
24 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

आई-मुलाच्या नात्याचा भावनिक पट: ‘हुंदका एका आईचा’चे चित्रीकरण पूर्ण

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 24 Oct 2026, 10:26 AM 👁 20
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

हुंदका एका आईचा’ या लघुचित्रपटाचे चित्रीकरण म्हसे खुर्द येथे उत्साहात पूर्ण

आई-मुलाच्या नात्याचा भावनिक पट: ‘हुंदका एका आईचा’चे चित्रीकरण पूर्ण

म्हसे खुर्द | जिल्हा प्रतिनिधी

आईचे अथांग प्रेम, तिची तळमळ आणि आई-मुलाच्या नात्यातील भावनिक संघर्ष मांडणाऱ्या ‘हुंदका एका आईचा’ या लघुचित्रपटाचे चित्रीकरण म्हसे खुर्द येथे उत्साहात पूर्ण झाले. तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या बॅनरखाली साकारलेल्या या चित्रपटाची कथा, निर्मिती व दिग्दर्शन रामदास राऊत यांनी केले आहे.

चित्रपटात राजेंद्र ताम्हाणे, अलकाताई जोगदंड, सोनाली मुसळे, खुशी टाकसाळ, सचिन शिरसागर व नितीन वेताळ यांच्यासह अनेक कलाकारांचा सहभाग आहे. डीओपी चंद्रकांत मोरे, क्रिएटिव्ह डायरेक्टर नितीन वेताळ आणि असिस्टंट डायरेक्टर अविनाश बोरवडे यांनी पडद्यामागची जबाबदारी सांभाळली.

म्हसे खुर्द येथील नारायण मदगे यांनी आपला बंगला चित्रीकरणासाठी विनामूल्य उपलब्ध करून देत मोलाचे सहकार्य केले. हा हृदयस्पर्शी लघुचित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
📲Get App