🔥 TRENDING વાવાઝોડાની શક્યતા સાથે ગુજરાતમાં ભારે... Haryana Enforces Full Firecracker Ban... PM Modi lauds Haryana’s heritage on st... President lauds Beti Bachao Beti Padha... Cattle Deaths in Janjgir Gauthan Spark... IAF commandos and Sarang team dazzle c...
01 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

गोदातीरावर श्रद्धेचा महासंगम, परंपरा आणि आधुनिकतेचा नवा अध्याय, सिंहस्थ कुंभपर्वाचा मंगलमय ध्वजारोहण सोहळा!

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 01 Nov 2026, 02:20 PM 👁 17
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
नीड २४न्यूज महाराष्ट्र
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे.
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक १/११/२०२६ विशेष वार्ता,
नाशिक :गोदातीरावर श्रद्धेचा महासंगम, परंपरा आणि आधुनिकतेचा नवा अध्याय, सिंहस्थ कुंभपर्वाचा मंगलमय ध्वजारोहण सोहळा!
हजारो वर्षांच्या श्रद्धेचा वारसा… प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली तपोभूमी… भगवान शंकराच्या सान्निध्याने पुनीत झालेले त्र्यंबकेश्वर आणि कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा अखंड प्रवाह असलेली गोदामाई! अशा पवित्र वातावरणात आज महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी रामकुंड, नाशिक येथे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुशावर्त तीर्थ, त्र्यंबकेश्वर येथे एकाच शुभमुहूर्तावर ध्वजस्तंभ व पवित्र ध्वजाचे पूजन आणि ध्वजारोहण करून 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळा 2027' चा शुभारंभ केला. या मंगल सोहळ्याने नाशिकच्या गोदातीरावर श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश घुमला.
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर येथील गोदाघाटावर ध्वजस्तंभाचे पूजन केले. तसेच महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी कुशावर्त तीर्थ, त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभ व पवित्र ध्वजाचे पूजन करून गोदाआरती केली. त्यानंतर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन आरती केली.
या सोहळ्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रामतीर्थ येथे पवित्र गोदावरीच्या तीरावर ‘गोदा महाआरती’ही संपन्न झाली. धार्मिक मंत्रोच्चार आणि आरतीच्या मंगलमय वातावरणात गोदामाईची आराधना करण्यात आली. याप्रसंगी अध्यात्मासोबत सामाजिक एकात्मता, परंपरेसोबत आधुनिकता आणि श्रद्धेसोबत पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम आगामी सिंहस्थ कुंभपर्वातून घडेल, असा विश्वास व्यक्त करत महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळा 2027' साठी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.
या पावन पर्वानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थ महाकुंभमेळ्याचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपली सनातन संस्कृती अनादी आणि अनंत आहे. अथांग सागराप्रमाणे असलेल्या या संस्कृतीच्या विविध अभिव्यक्ती आणि आविष्कारांचा महासंगम म्हणजे कुंभपर्व आहे. गंगा-गोदावरीच्या पवित्र स्नानाची परंपरा जपणारा कुंभमेळा हा केवळ भारताचाच नव्हे, तर जगभरातील भाविकांच्या आस्थेचा उत्सव आहे.
गोदावरीच्या महागोदा आरतीसाठी हजारो आदिवासी बांधव सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना सनातन संस्कृतीच्या जतनात आदिवासी जनजातींचे योगदान मोलाचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. 650 गावांतील 6233 जनजातीय बंधू-भगिनींच्या सहभागातून साकारलेल्या भव्य गोदा महाआरतीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली असून आगामी सिंहस्थ कुंभपर्व भव्य, दिव्य आणि सुंदर करण्याबरोबरच नाशिक व त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील विकासकामे प्रत्यक्षात साकारत आहेत. शासनाची भूमिका सुविधा निर्माण करण्याची असून या कुंभपर्वाचे खरे मालक साधू-महंत आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या.
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिककरांचे आभार व्यक्त केले. 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभ 2027' च्या धर्मध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहून पवित्र ध्वजारोहण केल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना धन्यवाद दिले.
या ऐतिहासिक सोहळ्यास राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री गिरीष महाजन, श्री श्रृंगेरी पीठाचे पूज्य जगद्गुरू शंकराचार्य श्री विदुशेखर भारती महास्वामीजी, नाणीजधाम चे स्वामी नरेंद्र नाथआणि विविध आखाड्यांतील संत-महंत, आमदार हिरामण खोसकर, इतर मंत्रीगण, मान्यवर आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
📲Get App