🔥 TRENDING मऊगंज में बाल विवाह पर सख्त निगरानी: क... पुलिस झण्डा दिवस पर पुलिस अधीक्षक जालौ... Gujarat Couple Killed, 12+ Injured as... Kerala Unveils ‘Sharan’ App to Streaml... Kerala Girl Suffers Kidney Failure Aft... Avengers: Doomsday Breaks Indian Box O...
23 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

*डी. एस. कमळे गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूट मंद्रूपला ‘सर्वोत्कृष्ट संगणक संस्था २०२६’ पुरस्कार* *मंद्रूपच्या शिरपेचात मानाचा तुरा; सभेत अभिजीत व अविनाश जवळकोटे यांच्या कार्याचे एमकेसीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विशेष कौतुक*

✍️ Reporter: YALLAPPA RAGATE (PATIL) 🗓 23 Nov 2026, 02:37 PM 👁 16
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
*डी. एस. कमळे गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूट मंद्रूपला ‘सर्वोत्कृष्ट संगणक संस्था २०२६’ पुरस्कार*

*मंद्रूपच्या शिरपेचात मानाचा तुरा; सभेत अभिजीत व अविनाश जवळकोटे यांच्या कार्याचे एमकेसीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विशेष कौतुक*

मंद्रूप (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून एमएस-सीआयटी व टॅली या संगणक प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी ३५० हून अधिक विद्यार्थ्यांची प्रवेश नोंदणी करून मंद्रूप येथील डी. एस. कमळे गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूटने ग्रामीण भागातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविण्याचा बहुमान पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेला *‘सर्वोत्कृष्ट संगणक संस्था २०२६’* या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर रोजी सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित एमकेसीएलच्या वार्षिक सभेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संस्थेचे संचालक अभिजीत जवळकोटे व उपसंचालक अविनाश जवळकोटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी एमकेसीएलचे वरिष्ठ अधिकारी अतुल पतोडी, अमित रानडे, विभागीय समन्वयक महेश पत्रिके, जिल्हा समन्वयक मीरा जेऊरकर मॅडम, रोहित जेऊरकर, मलिक शेख, राहुल बारावकर , अलोक मालू ,शिवानंद पाटील , यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच सोलापूर जिल्ह्यातील २०० हून अधिक संगणक प्रशिक्षण केंद्रचालकांची उपस्थिती होती.

या वार्षिक सभेत अभिजीत जवळकोटे व अविनाश जवळकोटे यांनी मंद्रूप व परीसारतील खेडेगावातील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे एमकेसीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले.

डी. एस. कमळे गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मंद्रूप व परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांना एमएस-सीआयटी, टॅली यांसह विविध संगणक प्रशिक्षण अभ्यासक्रमांचे दर्जेदार शिक्षण दिले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना संगणक साक्षर बनविण्यासाठी संस्थेचे संचालक अभिजीत जवळकोटे व उपसंचालक अविनाश जवळकोटे सातत्याने प्रयत्नशील आहेत.

विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर संस्थेने एमएस-सीआयटी व टॅली अभ्यासक्रमांसाठी ३५० हून अधिक प्रवेश नोंदवून ग्रामीण भागातून सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. या यशाची दखल घेत एमकेसीएलने संस्थेचा गौरव केला.

ग्रामीण भागात राहूनही संगणक शिक्षण क्षेत्रात जिल्हास्तरावर मिळविलेले हे यश मंद्रूपसह संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या पुरस्काराबद्दल संस्थेचे संचालक अभिजीत जवळकोटे व उपसंचालक अविनाश जवळकोटे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.



*डी. एस. कमळे गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूट मंद्रूपला ‘सर्वोत्कृष्ट संगणक संस्था २०२६’ पुरस्कार प्रदान करताना एमकेसीएलचे वरिष्ठ अधिकारी अतुल पतोडी ,अमित रानडे , जिल्हा समन्वयक रोहित जेऊरकर , मीरा जेऊरकर , महेश पत्रिके , अलोक मालू , राहुल बारावकर, आदि*
📲Get App