🔥 ट्रेंडिंग नांदेड जिल्ह्यातील बळेगाव येथे भीम आर्... સ્પેશિયલ રિપોર્ટ: "રીલ્સના નાદમાં સ્ટા... नवादा में डीएम और एसपी ने वृहद आश्रय ग... જગદીશભાઈ નંદાણીયા દ્વારા માંગરોળમાં દિ... अमिताभ बच्चन ने हाथ दर्द और स्वास्थ्य... बॉलीवुड सितारे भेजे दिवाली की शुभकामना...
08 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
जीवनशैली

भूमिगत कोळसा खाणीत भीषण दुर्घटना; ३६ वर्षीय कामगाराचा मृत्यू

✍️ रिपोर्टर: DOCTOR PINTU PAUL 🗓 08 नव. 2026, 07:43 PM 👁 12
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

भूमिगत कोळसा खाणीत भीषण दुर्घटना; ३६ वर्षीय कामगाराचा मृत्यू

भूमिगत कोळसा खाणीत भीषण दुर्घटना; ३६ वर्षीय कामगाराचा मृत्यू
वरोरा तालुक्यातील चारूरखटी गावावर शोककळा; खाण कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
वरोरा (चंद्रपूर) : नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी येथील वेकोलिच्या भूमिगत कोळसा खाणीत काम सुरू असताना झालेल्या दुर्घटनेत वरोरा तालुक्यातील ३६ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. जगदीश आसुटकर असे मृत कामगाराचे नाव असून ते चारूरखटी येथील रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास खाणीत अंदाजे २०० मीटर खोलवर काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. या घटनेत जगदीश आसुटकर यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खाण परिसरातील कामगार व कर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी धाव घेतली.
कोळसा खाण प्रकल्पासाठी परिसरातील मोठ्या प्रमाणात शेतजमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये जगदीश आसुटकर यांच्या शेतजमिनीचाही समावेश होता. जमीन संपादनानंतर वेकोलिने त्यांना सुमारे तीन वर्षांपूर्वी पाटणसावंगी येथील भूमिगत कोळसा खाणीत नोकरी दिली होती. ते पत्नी आणि दोन मुलांसह खाण परिसरातील वसाहतीत राहत होते.
या दुर्दैवी घटनेमुळे चारूरखटी गावात शोककळा पसरली असून त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर भूमिगत कोळसा खाणीतील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. खाण प्रशासनाने दुर्घटनेची सखोल चौकशी करून अपघाताचे नेमके कारण स्पष्ट करावे, खाणीत सुरक्षिततेच्या नियमांचे पालन होत आहे की नाही याची तपासणी करावी आणि मृत कामगाराच्या कुटुंबाला नियमानुसार योग्य आर्थिक मदत व इतर लाभ तातडीने उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी होत आहे.
📲Get App