🔥 ट्रेंडिंग धनपुरी नगर पालिका के वार्ड‑1 में नर्मद... खैरथल में शुरू हुआ आधुनिक सुविधाओं से... गाय को समय पर चारा न मिलने से स्वास्थ्... प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने छठ पूजा क... തൃക്കാർത്തിക മഹോത്സവം നടത്തും ग्वालियर: कोर्ट मैरिज से नाराज रिश्तेद...
13 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
कृषि

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली १६ नोव्हेंबरला सोलापुरात भव्य मोर्चा

✍️ रिपोर्टर: DOCTOR PINTU PAUL 🗓 13 नव. 2026, 12:03 PM 👁 8
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली १६ नोव्हेंबरला सोलापुरात भव्य मोर्चा
सोलापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, त्यांच्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात आणि ऊस दराबाबत होणारा अन्याय थांबवावा, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चाची सुरुवात सकाळी ११ वाजता चार पुतळा, हुतात्मा चौक, सोलापूर येथून होणार आहे.
संघटनेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल प्रतिटन ३,५०० रुपये मिळावी, तसेच ऊस गाळप हंगामात प्रतिटन १०० रुपये आणि साखरेच्या दरानुसार पुढील वर्षभरात ४५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्यास प्रतिटन आणखी २०० रुपये देण्याची मागणी करण्यात आली आहे.
कोल्हापूर, कर्नाटक, सातारा आणि पुणे जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरातील तफावतीचा मुद्दाही या आंदोलनातून उपस्थित करण्यात येणार आहे.
'ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे,' अशी भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या भव्य मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
आयोजक : स्वाभिमानी शेतकरी संघटना, सोलापूर जिल्हा.
📲Get App