🔥 TRENDING Deadly attack in Yemen's Taiz province... Karnataka to Build Mandapam Like Bhara... Netanyahu's Secret Abu Dhabi Visit: Me... Over 2,000 police deployed as stone‑pe... PM Modi Says India Gave Befitting Repl... Iran's IRGC Says It Captured Second US...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
धनाजी दळवी यांनी मांडले शेतकरी व सहकारितेचे विविध प्रश्न.
Agriculture

धनाजी दळवी यांनी मांडले शेतकरी व सहकारितेचे विविध प्रश्न.

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 17 Sep 2026, 08:35 PM 👁 128
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

धनाजी दळवी यांनी मांडले शेतकरी व सहकारितेचे विविध प्रश्न.

धनाजी दळवी यांनी मांडले शेतकरी व सहकारितेचे विविध प्रश्नमुरबाड जिल्हा प्रतिनिधी काशिनाथ देसले, तालुका प्रतिनिधी मुरबाड दिनांक १७/०९/२०२६:ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या वार्षिक सभेत मुरबाड तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व धनाजी दळवी यांनी शेतकरी, सहकारी संस्था, तरुण, विद्यार्थी, शिक्षक आणि बँक कर्मचारी यांच्या हिताचे विविध महत्त्वपूर्ण प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडले.वार्षिक सर्वसाधारण सभा ही केवळ आर्थिक अहवाल मंजूर करण्यापुरती मर्यादित नसून, ती संस्थेच्या भविष्यातील ध्येयधोरणांना दिशा देणारे महत्त्वाचे व्यासपीठ असते. याद्वारे बँकेच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण होण्यास मदत होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.या सभेत धनाजी दळवी यांनी प्रामुख्याने खालील मागण्या व मुद्दे उपस्थित केले:नफा कमी होण्याच्या कारणांचा आढावा: बँकेचा नफा कमी झाल्याबद्दल दळवी यांनी चिंता व्यक्त करत यामागच्या कारणांचा शोध घेण्याची मागणी केली. बँकेचा नफा वाढवण्यासाठी आणि सहकार क्षेत्रातील उपक्रमांना आर्थिक हातभार लावण्यासाठी योग्य तरतुदी कराव्यात, अशी सूचना त्यांनी केली.धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्या: शासकीय एकाधिकार धान खरेदी योजनेत धान विकणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांना निधी मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना ११ टक्के व्याजाचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. यावर बँकेने तोडगा काढून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी त्यांनी केली.मृत कर्जदारांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती: कर्ज घेतलेल्या एखाद्या सभासदाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबावर वसुलीचा तगादा न लावता बँकेने सहानुभूतीची भूमिका घ्यावी, अशी आग्रही मागणी दळवी यांनी केली.कर्मचारी व सभासदांचे कल्याण: बँकेच्या पगारी कर्मचाऱ्यांसाठी आणि सभासदांसाठी व्यापक विमा संरक्षण उपलब्ध करून द्यावे. तसेच पगारदार खाती बँकेत आणण्यासाठी आणि त्यांना सन्मानजनक सेवा देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे त्यांनी नमूद केले.धर्मादाय निधीचा ग्रामीण भागासाठी उपयोग: बँकेच्या धर्मादाय निधीचा उपयोग केवळ औपचारिक स्वरूपात न करता, ग्रामीण व गरजू घटकांसाठी सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी करावा, अशी मागणीही त्यांनी केली.या सभेत दळवी यांनी मांडलेल्या मुद्द्यांमुळे शेतकऱ्यांच्या आणि सहकार क्षेत्रातील अनेक जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फुटली आहे.
📲Get App