🔥 TRENDING मुख्यमंत्री निशुल्क जांच योजना के कार्... झांसी की सिपरी बाजार मंडी में भीषण आग,... સુરત ગ્રામ્ય: અનાવલ પોલીસ વિસ્તારમાં સ... Producer Ravi Shankar Says 'Hanuman An... BJP-Akali Dal Alliance Talk Gains Mome... SC directs Punjab to submit afforestat...
09 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रासमोरील चौफुलीवर भीषण अपघात; भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी.....!

दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रासमोरील चौफुलीवर भीषण अपघात; भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी.....!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 09 Oct 2026, 10:14 AM 👁 5
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रासमोरील चौफुलीवर भीषण अपघात; भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी.....!

विभागीय प्रतिनिधी

दीपनगर :- दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या ५०० मेगावॅट गेटसमोर असलेल्या चौफुलीवर बुधवारी (दि. ७) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच ३० एए ४६५३ क्रमांकाची कार भरधाव वेगात जात असताना रस्ता ओलांडत असलेल्या एमएच १९ डीआर ०७९० क्रमांकाच्या दुचाकीला तिने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. प्राथमिक माहितीनुसार दोन्ही जखमी हे निंभोरा येथील रहिवासी आहेत.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी मदत केली. या घटनेमुळे काही काळ चौफुलीवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, ५०० मेगावॅट गेटसमोरील ही चौफुली अपघातप्रवण बनली असून या ठिकाणी यापूर्वीही अनेक वेळा अपघात घडले आहेत. या मार्गावरील वाढती वाहतूक आणि वाहनांचा बेसुमार वेग यामुळे हा परिसर अत्यंत धोकादायक बनला आहे. रस्ता ओलांडताना वाहनचालक व पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागत असल्याने या ठिकाणी गतिरोधक, दिशादर्शक फलक व वाहतूक नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
📲Get App