🔥 TRENDING राजस्थान में सिंधी भाषा कोर्स का 98.64... Bhoomi Trivedi Stars in India’s First... Uttarakhand Court Directs State to Pay... Uttarakhand TET 2026 Answer Key Releas... Uttarakhand Issues Yellow Alert for Ra... India Bloc Marches to Election Commiss...
06 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

दापोलीत बेकायदा मटका जुगारावर पोलिसांची कारवाई, एकावर गुन्हा दाखल

✍️ Reporter: Dr.Aniket Mestri 🗓 06 Oct 2026, 11:56 AM 👁 18
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

५ ऑक्टोबर २०२६ रोजी दापोली शहरातील बेकायदा मटका जुगाराविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली, आरोपी तुकाराम नारायण जुवळे यांच्यावर गुन्हा नोंदवला.

दापोली शहरात बेकायदा मटका जुगार चालू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी पोलिसांनी कारवाई केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, दापोली एस.टी. बसस्थानकासमोर स्वागत हॉटेलच्या मागील बाजूस, स्टेपीन बारजवळ एका व्यक्तीकडून बेकायदा मटका जुगाराचा खेळ सुरू असल्याचे आढळले. आरोपी नागरिकांकडून पैसे स्वीकारून परवाना न घेता जुगार चालवित असल्याचा आरोप आहे.

तुकाराम नारायण जुवळे (वय ३५, दापोली, आदर्श शाळेच्या मागे, ता. दापोली) यांच्यावर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्यांच्याकडून १,०५० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले.

याबाबत दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २१३/२०२६ नुसार महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२(अ) अंतर्गत FIR नोंदवली असून, शिपाई जगदीश सुरेश आंबवणे यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.
📲Get App