🔥 TRENDING भूमि सुधार राजस्व मंत्री दिलीप जायसवाल... सिंगरौली, देओसर तहसील में पंछायत कुंडव... ದೇವದುರ್ಗದಲ್ಲಿ ಭಕ್ತ ಕನಕದಾಸರ ಜಯಂತಿ ಅರ್ಥಪ... News18 Lists 8 Top Christmas Destinati... निगोही में रावण दहन पर उमड़ी हजारों की... પૂરી-ગાંધીધામ એક્સપ્રેસમાં ૪.૩૫ લાખના...
27 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

तापी काठी अवैध गौण खनिज वाहतुकीवर महसूलचा बडगा; ४ डंपर, पोकलँड, जेसीबीसह ६ वाहने जप्त....

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 27 Nov 2026, 06:11 PM 👁 15
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

यावल : तालुक्यातील पिंपरी शिवारात तापी नदीकाठी सुरू असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. तहसीलदार मोहनमाला नाझीर कर यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत महसूल विभागाच्या पथकाने चार मोठे डंपर, एक पोकलँड मशीन आणि एक जेसीबी अशी एकूण सहा वाहने जप्त केली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी शिवारात तापी नदी परिसरात अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार तहसीलदार कर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी छापा टाकला. यावेळी अवैध वाहतूक करताना आढळून आलेली वाहने ताब्यात घेण्यात आली.

तहसीलदारांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून कारवाई करून घेतल्याने अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तापी नदी परिसरात सुरू असलेल्या गौण खनिजाच्या वाहतुकीवर महसूल विभागाने थेट कारवाईचा बडगा उगारल्याने तालुक्यात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या वाहनांबाबत पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. या कारवाईनंतर अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर महसूल विभागाची पुढील भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📲Get App