🔥 TRENDING અમદાવાદમાં દબાણ દૂર કરવાની કામગીરી સામ... FIR Filed Against Five Accused in Amri... Gunshot Hits Groom's Brother During We... Ludhiana Youth Murdered After Money Tr... Delhi Police Arrest Interstate Gang in... দুর্গাপুরে ৩০ ফুটের হনুমান মূর্তির উদ্...
27 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य नियुक्तीला हिरवा कंदील...!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 27 Nov 2026, 05:55 PM 👁 18
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

तज्ज्ञांना प्रतिनिधित्वाची संधी; पारदर्शकतेसाठी ग्रामविकास विभागाचे नवे निर्देश

जळगाव : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीसाठी आता हिरवा कंदील मिळाला आहे. ग्रामविकास व पंचायतराज विभागाने याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, नियुक्ती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यावर भर दिला आहे.

नव्या निर्देशांनुसार, जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या एकूण सदस्यसंख्येच्या 10 टक्के अथवा किमान 5 सदस्य स्वीकृत म्हणून नियुक्त केले जातील. तर पंचायत समितीमध्ये 20 टक्के अथवा किमान 1 सदस्याची नियुक्ती करण्यात येईल. यामुळे राजकीय प्रतिनिधींबरोबरच विविध क्षेत्रांतील अनुभवी व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

स्वीकृत सदस्यांची संख्या निश्चित करताना अपूर्णांकाबाबत स्पष्ट सूत्र ठरवून देण्यात आले आहे. अर्ध्यापेक्षा कमी असलेला अपूर्णांक वगळण्यात येईल, तर अर्धा किंवा त्याहून अधिक अपूर्णांक हा पूर्णांक म्हणून गृहीत धरला जाईल.

जागावाटपात राजकीय समतोल राखण्यात येणार असून, निवडून आलेल्या सदस्यांच्या संख्याबळाच्या प्रमाणात पक्ष, गट आणि आघाड्यांना स्वीकृत सदस्यांच्या जागा मिळतील. वाटपादरम्यान समान अपूर्णांक आल्यास सोडत काढून निर्णय घेतला जाईल.

या संपूर्ण प्रक्रियेत जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संबंधित राजकीय पक्षांच्या नेत्यांशी विचारविनिमय करून पात्र व्यक्तींची नावे सुचवतील. एखाद्या शिफारस केलेल्या नावाला नकार दिल्यास, त्याची ठोस कारणे लेखी स्वरुपात नमूद करणे बंधनकारक असणार आहे. या तरतुदीमुळे नियुक्त्यांमध्ये मनमानीला चाप बसून पारदर्शकता अबाधित राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

वैद्यकीय, शिक्षण, कृषी, जलसंधारण, सहकार, ग्रामीण विकास, महिला व बालविकास, कला, साहित्य, समाजकार्य, अभियांत्रिकी आणि विधी या क्षेत्रांत विशेष ज्ञान व अनुभव असलेल्या मान्यवरांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी दिली जाणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा विकासकामे आणि धोरणात्मक निर्णयांना होईल, अशी अपेक्षा आहे.

यासंदर्भात बोलताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे कामकाज अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व परिणामकारक करणे, हाच या निर्णयामागील प्रमुख हेतू आहे. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना सोबत घेतल्यास ग्रामीण विकासाला नवी गती मिळेल. राजकीय संख्याबळ लक्षात घेऊन ठरलेल्या निकषांप्रमाणे ही प्रक्रिया राबवली जाईल आणि गुणवत्तेला प्राधान्य देत पारदर्शकता जपली जाईल.
📲Get App